दिलीप सोनिगरा ज्वेलर्स व मोहिनी ब्रँड चिंचवड शाखेस खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची भेट

चिंचवड (www.pragatbharat.com):शिवपुत्र संभाजी महानाटया मधील संभाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत असलेले व शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या चिंचवड येथील मुख्य शाखेत सदिच्छा भेट दिली. यावेळी सुवर्ण पेढीचे मालक दिलीप सोनिगरा, करण सोनिगरा सोनिगरा परिवारातील सदस्य आणि सोनिगरा ज्वेलर्सच्या संपूर्ण टीमने डॉ. अमोल कोल्हे यांचे स्वागत शालपुष्पगुच्छ व स्तचिन्ह देऊन केले.यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांचे चाहते आणि सोनिगरा ज्वेलर्सच्या ग्राहकांनी गर्दी केली. यावेळी कुमार नेवाळे, संगीता तरडे, दिनकर चिंचवडे, नितीन चिंचवडे, शिवाजी सावंत आदी मान्यवर व्यक्तीही यावेळी उपस्थिती होती. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोनिगरा ज्वेलर्स शोरूम मधील विविध सोन्याचे आणि चांदीचे दागिने पाहिले. त्यामध्ये सोन्याचे ब्रेसलेट, चेन, अंगठीमधील शिवाजी महाराज आदींचे त्यांनी कौतुक केले. शोरुमच्या दोन्ही मजल्यावर जाऊन त्यांनी पाहणी केली..दिलीप सोनिगरा ज्वेलर्सची मोहिनी ब्रँड असलेल्या शेजारच्या शाखेमध्ये देखील डॉ. अमोल कोल्हे यांनी भेट दिली. दोन्ही शोरुम मधील पारंपारिक दागिन्यांचेही त्यांनी कौतुक केले. दिलीप सोनिगरा म्हणाले, “खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची अंगठी पहिली. त्याचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले. “

Related posts