ISRO Chandrayaan 3 Mission Preparations In Final Stage Know About When Will The Be Launched

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chandrayaan-3 Launch Date: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) महत्त्वाकांक्षी चंद्र मोहीम (मून मिशन) चांद्रयान-3 लाँच करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. हे यान यूएन राव उपग्रह केंद्रातून प्रक्षेपित केले जाणार असून ते कधी प्रक्षेपित केलं जाईल याबाबतही स्पष्टता आली आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याची योजना आहे. लँडिंग साईटच्या आसपास चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी ते वैज्ञानिक उपकरणांसह जाईल. इस्रो अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार जर सर्व काही नियोजित पद्धतीने होत गेल्यास चांद्रयान-3 जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात प्रक्षेपित केले जाईल.

प्रक्षेपणाशी संबंधित आवश्यक चाचण्या यशस्वी

इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी मार्चमध्ये चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणाशी निगडीत आवश्यक त्या चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत. चांद्रयान-3 मोहिमेच्या प्रक्षेपण वाहनाच्या क्रायोजेनिक अप्पर स्टेजला शक्ती देणाऱ्या CE-20 क्रायोजेनिक इंजिनची उड्डाण स्वीकृती हीट चाचणी यशस्वी झाली आहे. लँडरची मोठी चाचणी EMI/EMC देखील यशस्वीरित्या पूर्ण झाली होती.

चांद्रयान-3  भारताच्या चांद्रयान मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग आहे. चांद्रयान 1 आणि चांद्रयान 2 चा हा पुढील टप्पा आहे. जो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि त्याची चाचणी करेल. ते चांद्रयान-2 सारखेच असेल. यात ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर असणार आहे. चंद्र मोहिमेतील तिसरे अंतराळ यान भारताच्या सर्वात वजनदार प्रक्षेपण वाहन GSLV Mk III मधून श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केले जाईल.

चांद्रयान मोहिमेच्या तयारीवर इस्रो प्रमुख म्हणतात..

दरम्यान, इस्रो अध्यक्ष के. सिवान यांनी अलीकडेच दिलेल्या माहितीनुसार चांद्रयान-3 चे प्रथम उद्दिष्ट यशस्वीरित्या लँडिंग करण्याचे आहे. त्यासाठी नवीन साधने तयार करणे, चांगला अल्गोरिदम तयार करणे, तसेच अपयशी पद्धतींची काळजी घेणे यासह बरेच काम केले जात आहे.

news reels Reels

चांद्रयान-2 दरम्यान काय घडलं होतं?

दरम्यान, 2019 मध्ये, चांद्रयान-2 (Chandrayaan-2) यान यशस्वीरित्या झेपावले होते ते चंद्राच्या कक्षेतही पोहोचलं होतं, पण लँडर सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. 6 सप्टेंबर 2019 मध्ये चंद्रावर उतरण्याच्या प्रयत्नात असतानाच ते क्रॅश झालं होतं. चांद्रयान-3 मध्ये स्वदेशी लँडर मॉड्यूल, एक रोव्हर समाविष्ट आहे. लँडरमध्ये नाजूकपणे लँड करण्याची आणि रोव्हर तैनात करण्याची क्षमता असेल, अशी माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे. चांद्रयान-3 मोहिमेसाठी 9 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

[ad_2]

Related posts