[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Kerala Women Lottery : ‘भगवान देता है तो छप्पर फाड के’… ही म्हण आणि प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटातील डायलॉग तुम्ही ऐकलाच असेल. पण असंच काहीस झालं आणि 11 महिलांचं नशीब पालटलं आहे. कचरा वेचणाऱ्या 11 महिलांनी पैसे जमा करून 250 रुपयांचं लॉटरीचं तिकीट खरेदी केलं. या लॉटरीच्या तिकीटाने त्यांना आता जणू सोन्याचे दिवस दाखवले आहेत. 250 रुपयांचं लॉटरीचं तिकीटावर त्यांना 10 कोटी रुपयांचं पहिलं बक्षीस मिळालं आहे.
250 रुपयांचं लॉटरीचं तिकीट अन् 10 कोटींचं बक्षीस
11 महिलांना मान्सून बंपर लॉटरीचं पहिलं पारितोषिक मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मलप्पुरम येथील परप्पनगडी नगरपालिकेतील हरित कर्म सेनेच्या (HKS) 11 महिला सदस्यांना लॉटरी लागली असून त्यांनी 10 कोटी रुपये जिंकले आहेत. पालिकेत कचरा गोळा करण्याचं काम करणाऱ्या 11 महिलांना एक-एक रुपया जोडून 250 रुपयांचं लॉटरीचं तिकीट खरेदी केलं. 11 पैकी नऊ महिलांनी 250 रुपयांचे तिकीट बक्षीस खरेदी करण्यासाठी 25 रुपये जमा केले होते तर, इतर दोन महिलांनी प्रत्येकी 12.5 रुपये दिले होते.
महिलांचा आनंद गगनात मावेनासा
लॉटरी जिंकणाऱ्या महिलांपैकी एकीने प्रतिक्रिया देत सांगितलं की, ‘गेल्या दोन-अडीच वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी घरातून आणि कार्यालयांमधून जैवविघटन न करता येणारा कचरा गोळा करणाचं काम आम्ही करतो. आम्ही एकत्र लॉटरी जिंकल्याचा आनंद असून आणि असंत एकत्र काम करू.’ या महिला पालिकेच्या 57 सदस्यीय हरित कर्म सेना (HKS) गटाचा भाग आहेत. बक्षीस जिंकल्यावर या महिलांना आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
‘या’ आहेत भाग्यवान महिला
एचकेएस सदस्य पी पार्वती, के लीला, एमपी राधा, एम शीजा, के चंद्रिका, ई बिंदू, कार्तियायिनी, के शोभा, सी बेबी, सी कुट्टीमालू आणि पी लक्ष्मी या मान्सून बंपर लॉटरी जिंकणाऱ्या भाग्यवान महिला आहेत, ज्यांनी संयुक्तपणे लॉटरीचं तिकिट खरेदी केलं होतं.
चौथ्या तिकीटावर उजळलं नशीब
परप्पानगडी येथील लॉटरी विजेच्या पार्वती यांनी सांगितलं की, त्यांनी लॉटरी जिंकणाची कोणतीही आशा बाळगली नव्हती कारण, त्यांनी पैसे जमा करून विकत घेतलेले ते चौथं लॉटरी तिकीट होतं. पण बुधवारी दुपारी जेव्हा मी काम संपवून घरी परतले तेव्हा माझ्या मुलाने मला विचारले की आम्ही तिकीट घेतले आहे का, कारण एका व्यक्तीने लॉटरीच्या तिकिटावर बक्षीस जिंकलं आहे, असे सांगण्यासाठी फोन केला होता.
[ad_2]