International Tiger Day History Significance Theme Project Tiger In India Status Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

International Tiger Day 2023: असं म्हटलं जातंय की वाघ जगला तर जंगल जगेल आणि पर्यायाने निसर्गातील अन्न साखळी कायम राहिल. वन्यप्राण्यांच्या अन्नसाखळीतील वाघ हा सर्वात वरचा प्राणी, निसर्गातील की स्टोन प्रजातींपैकी एक. पण नैसर्गिक अधिवास नष्टता, अवैध शिकार, तस्करी, जंगलतोड आणि इतर कारणांमुळे वाघांची संख्या कमी झाली. त्यामुळे त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 29 जूलैला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातोय. 

रशियातील सेंट पीटर्सबर्ग मध्ये 29 जुलै 2010 साली झालेल्या व्याघ्र संवर्धनाच्या शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. या दिवसाचा उद्देश वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे, तसेच त्याबद्दल जनजागृती करणे आणि वाघांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करणे असा आहे. त्या माध्यमातून मानव-वाघ संघर्षाची दरी कमी करणे आणि निसर्गाचे संवर्धन करणे साध्य केले जाऊ शकेल.

Tiger Population in India  : जगात सर्वाधिक वाघ हे भारतात 

2022 सालच्या व्याघ्र जनगणनेमध्ये भारतात 3,167 वाघ असल्याचं स्पष्ट झालं आहे. 2006 ते 2018 या काळात भारतामध्ये वाघांच्या संरक्षणासंबंधी करण्यात आलेल्या कामांमुळे वाघांची संख्या जवळपास दुप्पट म्हणजे 1400 वरून 3000 पर्यंत पोहोचली होती. 

भारतात एकूण 53 व्याघ्र संरक्षित क्षेत्रे आहेत. जगातल्या 75 टक्के वाघांचे वास्तव्य हे भारतात आहे. भारतात सध्या सर्वाधिक वाघांची संख्या ही मध्य प्रदेशमध्ये आहे. त्या खालोखाल कर्नाटक, उत्तराखंड, महाराष्ट्र, तामिळनाडू, आसाम, केरळ, राजस्थान, ओडिशा आणि छत्तीसगडचा क्रमांक लागतो. 

मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक म्हणजे 526 वाघ आहेत, त्या खालोखाल कर्नाटकमध्ये 524 वाघ आहेत. महाराष्ट्राचा या यादीमध्ये चौथा क्रमांक लागत असून राज्यातील पाच व्याघ्र प्रकल्पांमध्ये 312 वाघ आहेत. 

भारतात सापडणारा बेंगॉल टायगर हा जगातील वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांपैकी एक मानला जातो. परंतु, अनिर्बंध शिकार आणि अधिवासावरील अतिक्रमणांमुळे त्यांची संख्या कमी होत आहे. वाघांची तस्करीसाठी अनिर्बंध शिकार, जंगलतोड आणि वाघांच्या अधिवासावर अतिक्रमण यामुळे मानव आणि वाघांमध्ये संघर्ष निर्मांण होताना दिसत आहे. 

Project Tiger History : ‘प्रोजेक्ट टायगर’ची सुरुवात

वाघांच्या संवर्धनासाठी  1973 साली भारत सरकारने प्रोजेक्ट टायगर हा प्रकल्प सुरु केला. बेंगॉल टायगर म्हणजे वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. प्रोजेक्ट टायगरच्या माध्यमातून वाघांच्या नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न सुरु झाला. प्रोजेक्ट टायगरसाठी नॅशनल टायगर कन्झर्व्हेशन ऑथोरिटी स्थापन करण्यात आली.  M-STrIPES या मॉनिटरिंग सिस्टिमच्या माध्यमातून वाघांच्या हालचालीवर पाळत ठेवण्यात आली. त्यामुळे आपोआपच त्यांच्या शिकारीवर नियंत्रण आले. 

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts