[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Weather Update : देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Rain) पडतोय. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, चंदीगड, हरियाणा, पंजाबमध्ये आजपासून (31 जुलै) ते 3 ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय पूर्व उत्तर प्रदेशात 3 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. तर, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये जिथे गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने जोर धरला होता. मात्र, आता पुन्हा एकदा दिल्लीकरांना दमट उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. दिल्लीत ऑगस्टचे पहिले पाच ते सहा दिवस पावसाची शक्यताही कमी आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, आज (सोमवारी) दिल्लीत अनेक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो.
आज ‘या’ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, मणिपूर, आसाम, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय गेल्या 24 तासांत राजस्थानच्या अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी झाली. राजस्थानबाबत हवामान विभागाने येत्या 24 तासांत अनेक भागांत पाऊस सुरूच राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
राज्यात 4 ऑगस्टपर्यंत मान्सून सक्रिय राहणार
त्याचवेळी हवामान विभागाने उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 4 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता व्यक्त करत अलर्ट जारी केला आहे. आज आणि मंगळवार, 1 ऑगस्ट रोजी पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. एवढेच नाही तर, राज्यात 4 ऑगस्टपर्यंत मान्सून सक्रिय राहणार आहे.
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
आज (31 जुलै) उत्तराखंडमधील 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान केंद्राने डेहराडून, नैनिताल, उधम सिंह नगर, पौरी, पिथौरागढ आणि चंपावत जिल्ह्यांच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. तर, मैदानी भागात दमट उन्हाळ्यानंतर येत्या काही दिवसांत लोकांच्या अडचणी वाढू शकतात. डेहराडूनमध्ये मुसळधार पावसानंतर तापमानात वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Monsoon Session: संसदेत आज सादर होऊ शकतं दिल्ली सेवा विधेयक; ‘INDIA’ च्या खासदारांची रणनिती काय? सभागृहात पुन्हा गदारोळाची शक्यता
[ad_2]