ISRO PSLV-C56Demonstrator Satellite,चांद्रयान-३नंतर इस्रोचं पुन्हा जबरदस्त उड्डाण; सिंगापूरच्या ७ उपग्रहांचं केलं यशस्वी प्रक्षेपण – successful launch of singapore’s 7 satellites by isro

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वृत्तसंस्था, श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश) : सिंगापूरच्या सात उपग्रहांचे रविवारी भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून (इस्रो) यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. सतीश धवन अवकाश केंद्रातून इस्रोने पीएसएलव्ही प्रक्षेपकाच्या साह्याने सातही उपग्रह अवकाशात सोडले.

प्रक्षेपणानंतर २३ मिनिटांनी प्रमुख उपग्रह वेगळा झाला आणि त्यापाठोपाठ सहा अन्य उपग्रह वेगळे झाले आणि त्यांनी अवकाशात प्रवेश केला. इस्रोची ही मोहीम व्यावसायिक संस्था ‘न्यू स्पेस इंडिया लिमिटेड’च्या माध्यमातून पार पडली. मोहिमेचे काउंटडाउन शनिवारी सुरू झाले होते. २५ तासांनंतर ते पूर्ण झाले. रविवारी सकाळी सहा वाजून ३१ मिनिटांनी उपग्रह अवकाशात झेपावले. याआधी प्रक्षेपणाची वेळ साडेसहा ठरली होती. मात्र, अवकाशातील कचरा रॉकेटच्या मार्गात येणार असल्याने ही वेळ एक मिनिटांनी वाढविण्यात आली, असे ‘इस्रो’च्या अधिकाऱ्याने ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला सांगितले.

सिंगापूरचे हे सात उपग्रह सोडण्यात आले…

१. डीएस-एसएआर (संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान एजन्सी, सिंगापूर)
वजन : ३६० किलो

२. आर्केड (डेमॉन्स्ट्रेटर उपग्रह)
वजन : २४ किलो

३. व्हेलोक्स-एएम (टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर मायक्रोसॅटेलाइट)
वजन : २३ किलो
जेव्हा पोलीसच चोरतात सोन्याची २४० नाणी; वाडा पाडताना सापडलेल्या ब्रिटिशकालीन खजिन्याचं गूढ काय?
४. स्कूब-२ (३यू नॅनोसॅटेलाइट)
वजन : ४ किलो

५. नुलियन (अत्याधुनिक ३यू नॅनोसॅटेलाइट)
वजन : ३ किलो

६. गलासिया-२ (३यू नॅनोसॅटेलाइट)
वजन : ३.५ किलो

७. ओआरबी-१२ स्ट्रायडर (आंतरराष्ट्रीय सहकार्याने तयार केलेला उपग्रह)
वजन : १३ किलो

[ad_2]

Related posts