[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
PM Kisan Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) ही केंद्रीय क्षेत्रातील सर्वात मोठी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी टप्प्या टप्प्यानं सहा हजार रुपयांचा निधी वितरीत केला जातो. 1 डिसेंबर 2018 पासून ही योजना लागू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत देशातील 11 कोटी शेतकरी कुटंबांना या योजनेचा लाभ मिळाला असून, 2.60 लाख कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली. खासदार विनायक राऊत आणि खासदार संजय जाधव यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर मंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी लोकसभेत ही माहिती दिली. दरम्यान, PM किसान योजना सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत महाराष्ट्रात कोणत्या वर्षी किती निधी दिला याची माहितीही तोमर यांनी दिली आहे.
PM किसान योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा निधी वितरीत केला जातो. आत्तापर्यंत 14 हप्ते वितरीत करण्या आले आहेत. प्रत्येक चार महिन्याच्या फरकारने शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता दिला जातो. 27 जुलैला राजस्थानमधील (Rajasthan) सीकर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन समारंभाद्वारे PM किसानचा 14 वा हप्ता वितरीत करण्यात आला. या योजनेद्वारे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वितरीत करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात कोणत्या वर्षी किती निधी वितरीत?
कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार 2018-19 मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 436.815 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. 2019 ते 20 या वर्षात राज्यातील शेतकऱ्यांना 4,898.806 कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. त्याचबरोबर 2020-21 मध्ये 6,671.801 कोटी, 2021-22 मध्ये 6,431.384 कोटी, 2022-23 मध्ये 5,654.625 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती तोमर यांनी लोकासभेत दिली.
शातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 14 व्या हप्त्याचे वितरण
राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. एकूण 18 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. तसेच देशातील सव्वा लाख ‘पी एम किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण केले. ही केंद्र शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त करतील, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या:
PM Kisan Yojana : 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसानचा 14 वा हप्ता जमा, पंतप्रधानांच्या हस्ते राजस्थानमध्ये विविध विकासकामांचं उद्घाटन
[ad_2]