Morning Headlines Breaking Nationalstate News Live Headlines Bulletin Morning Today 4th August 2023 Thursday Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील…  

दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर, आता राज्यसभेत लागणार विधेयकाची कसोटी

 दिल्लीतील (Delhi) अधिकाऱ्यांच्या बदली आणि पोस्टिंगसंदर्भातले विधेयक लोकसभेत (Loksabha) मांडण्यात आले असून हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी लोकसभेत हे विधेयक गुरुवारी (4 जुलै) रोजी सादर केले.आता हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार असून त्यावर राज्यसभेत चर्चा करण्यात येणार आहे.  (वाचा सविस्तर)

NDA म्हणजे स्थिरता, त्यामुळं देशाच्या राजकारणाला स्थैर्य; बिहारमधील खासदारांच्या बैठकीत पंतप्रधानांचं वक्तव्य  

 पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवारी (3 ऑगस्ट) भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) बिहारमधील खासदारांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी NDA म्हणजे स्थिरता, त्यामुळेचं देशाच्या राजकारणाला स्थैर्य प्राप्त झाल्याचं वक्तव्य केलं. यावेळी मोदींनी खासदारांना निवडणुकीत विजयाचा मंत्र दिला आहे.  (वाचा सविस्तर)

सीमा हैदर लढवणार निवडणूक? ‘या’ केंद्रीय मंत्र्यांच्या पक्षाकडून ऑफर, फक्त एकच अट

 प्रेमासाठी पाकिस्तानात गेलेली अंजू (Anju) आणि पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा (Seema Haider) यांची लव्ह स्टोरी सध्या चांगलीच चर्चेत आहे. पाकिस्तानी सीमा थेट सीमा पार करून भारतात आली आणि तिने सचिनसोबत लग्न केलं. यानंतर सर्वत्र या दोघांची चर्चा सरु आहे. पाकिस्तानी सीमा हैदरचं भारतात येणं आणि येथे लग्न करून राहणं सर्वच वादाच्या भोवऱ्यात आहे. (वाचा सविस्तर)

देशात वर्षाला 15000 हून अधिक लोकांचं अवयव दान, यासारखी दुसरी मोठी सेवा नाही : डॉ. मनसुख मांडविया 

 दुसऱ्या व्यक्तीला जीवनदान देण्यासारखी मानवतेसाठी दुसरी मोठी सेवा असू शकत नाही, असे वक्तव्य केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया (Dr Mansukh Mandaviya) यांनी केलं. वर्षाला 15,000 हून अधिक लोक अवयव दान (organ donation) करत असल्याचे ते म्हणाले. 13 व्या भारतीय अवयव दान दिन (आयओडीडी) समारंभात ते बोलत होते.  (वाचा सविस्तर)

लोकसभेत डेटा संरक्षण बिल सादर, उल्लंघन केल्यास कंपन्यांना बसणार 250 कोटीपर्यंत दंड

 केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी (3 ऑगस्ट) लोकसभेत डेटा संरक्षण विधेयक 2023 सादर केले. हे विधेयक लोकसभेत आवाजी मतदानाने मांडण्यात आले आहे. या प्रस्तावित कायद्याला विरोधी पक्षाच्या खासदारांनी आक्षेप घेतला आणि तो संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी केली. 
  (वाचा सविस्तर)

 वृषभ, तूळसह ‘या’ राशीच्या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं; जाणून घ्या सर्व राशींचं आजचं राशीभविष्य

आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मिथुन राशीच्या लोकांना समाजाचं भलं करण्याची संधी मिळेल. तर, कुंभ राशीच्या लोकांना व्यवसायाला पुढे नेण्यात यश मिळेल. मेष ते मीन राशीसाठी आजचा शुक्रवार कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.
  (वाचा सविस्तर)

मुंबई महापालिकेचे जनक फिरोजशहा मेहता, गायक किशोरकुमार यांचा जन्म; आज इतिहासात 

इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. या दिवसात काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या असतात. आजच्या दिवशी भाभा अणुकेंद्रात ‘अप्सरा’ ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली होती. मुंबई महापालिकेचे जनक समजले जाणारे सर फिरोजशहा मेहता यांचा जन्मदिन आज आहे. सिनेसृष्टीत आपली अजरामर छाप सोडणारे गायक-अभिनेते-दिग्दर्शक-निर्माते किशोर कुमार यांचा जन्मदिनही आज आहे. (वाचा सविस्तर)

[ad_2]

Related posts