‘या’ ग्रहाची महादशा असल्यास 20 वर्ष जगाल राजासारखं! दिवसरात्र पैशांचा पाऊस?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shukra Mahadasha : वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं आपलं महत्त्व आणि वैशिष्ट्य आहे. ज्योतिषशास्त्रात कुंडलीतील ग्रहांची स्थिती तुमचं भविष्य, वर्तमानावर भाष्य करते. कुंडलीतील ग्रहांची स्थिती शुभ किंवा अशुभ असेल तर जाचकाच्या आयुष्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. 9 ग्रहांमध्ये शुक्र ग्रह हा जाचकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. शुक्र हा धनसंपदा, सौदर्यं, विलास याचा कारक मानला जातो. त्यामुळे शुभ असा शुक्राची कुंडलीतील महादशा पाहता त्याची स्थिती मजबूत असेल तर रंकाला तो राजा करतो. (shukra mahadasha 20 years people live life like raja astrology in marathi)

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राच्या महादशाचा प्रभाव जाचकाच्या आयुष्यावर 20 वर्षे राहतो. अशा स्थितीत एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत असेल तर त्याला भरपूर धन-समृद्धी मिळते. तर, व्यक्तीला राजासारखं जीवन जगता येतं. 

शुक्राच्या महादशामध्ये असं मिळतं फळं

पंडित ज्योतिषांचं असं म्हणं आहे की, व्यक्तीच्या कुंडलीत उच्च स्थानावरील शुक्र व्यक्तीचं भाग्य उजाळतो. व्यक्तीची सर्व कामं आणि इच्छा तो पूर्ण करतो.  तर दुसरीकडे, कुंडलीत शुक्र अशक्त असतो तेव्हा जाचकाचं आयुष्य संघर्षमय असतं. त्याच्या आयुष्यात आर्थिक हानी पासून अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. अशा स्थितीत शुक्राचं अशुभ परिणाम टाळण्यासाठी पडितांनी काही उपाय सांगण्यात आले आहेत.  

शुक्र अशक्त असताना ‘हे’ उपाय करा 

– ज्योतिष शास्त्रानुसार शुक्रवारी माता लक्ष्मीसोबत शुक्रदेवाची पूजा करावी. या दरम्यान शुक्र देवाच्या बीज मंत्राचा जप करा. हा उपाय केल्यास फायदा होतो. याशिवाय माता लक्ष्मीची पूजा करून तांदळाची खीर किंवा दुधाची मिठाई अर्पण करा.

–  शुक्र ग्रहाला बळ देण्यासाठी शुक्रवारी मुंग्यांना मैदा आणि साखर खाऊ घाला. यामुळे व्यक्तीला शुक्र दोषापासून आराम मिळतो. 

–  शुक्रवारी शुक्र ग्रहाशी संबंधित वस्तू जसं दूध, दही, तूप, पांढरे वस्त्र, पांढरे मोती इत्यादी दान करा. 

– या दिवशी पांढरे कपडे परिधान करा आणि शक्यतो पांढर्‍या वस्तू वापरा. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts