11th August Headline Parliament Monsoon Session Last Day INDIA Opposition Party Meeting Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

11th August Headline : संसदेच्या अधिवेशानाचा आज शेवटचा दिवस असून अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच रस्त्यांची दुरवस्था आणि उघड्या मॅनहोल्सबाबत मुंबई उच्च न्यायालायत महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. पुण्यातील  कोंढवा परिसरातून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस

20 जुलै ते 11 ऑगस्ट असं  23 दिवस संसदेचं अधिवेशन सुरु होतं. त्यामुळे आजच्या शेवटच्या दिवशी अधिवेशनात कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

इंडिया आघाडीची बैठक

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. त्याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडणार आहे. लोकसभेत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाच्या कारवाईमुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. 

केंद्र सरकारकडून तिरंगा यात्रेचं आयोजन

केंद्र सरकारकडून आज तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये सर्व खासदार आणि मंत्री सहभागी होणार आहेत. दिल्लीतील प्रगती मैदान ते कर्तव्य पथापर्यंत मोटारसायकलवरुन ही तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. 

एनडीएच्या प्रवक्त्यांची बैठक

एनडीएच्या प्रवक्त्यांची बैठक पार पडणार असून या बैठकीमध्ये अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे या बैठकीचं नेतृत्व करणार आहे. तसेच या बैठकीमध्ये अनुराग ठाकूर, चिराग पासवान, अनुप्रिया पटेल  यांच्यासह एनडीएचे प्रवक्ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

न्यायाधीशांच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालय आदेश देणार 

देशभरातील न्यायाधीशांच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालय आदेश देणार आहे. 021 मध्ये झारखंडमधील धनबाद येथील जिल्हा न्यायाधीशांच्या मॉर्निंग वॉक दरम्यान ऑटोरिक्षाच्या धडकेने झालेल्या संशयास्पद मृत्यूची दखल घेत सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी करण्यात आली आहे. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

रस्त्यांची दुरवस्था आणि उघड्या मॅनहोल्सबाबत मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील 6 महापालिका आयुक्तांना कोर्टानं समन्स बजावलं असून आज सर्वांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. 

पुण्यातील दहशतवाद्यांना कोर्टात हजर करणार 

पुण्यातील कोंढवा परिसरातून  अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची पोलीस कोठड संपत असल्याने शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान या चौकशीमध्ये आणखी कोणते खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

[ad_2]

Related posts