Khudiram Bose Hanged Dadra And Nagar Haveli Merged In India History Today

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

11th August In History: भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये अशा काही घटना घडल्या आहेत, अशा काही क्रांतिकारकांनी बलिदान दिलं आहे की ज्यामुळे स्वातंत्र्यलढ्याची दिशाच बदलून गेली. खुदीराम बोस हा त्यापैकीच एक क्रांतिकारक. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी, 11 ऑगस्ट रोजी हा किशोरवयीन क्रांतिकारक हातात गीता घेऊन फासावर चढला होता. त्याच्या निर्भयपणाने आणि शौर्याने इंग्रज सरकार इतके घाबरले होते की त्याचे वय कमी असूनही त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली. खुदीराम बोसची लोकप्रियता एवढी होती की त्याला फाशी दिल्यानंतर बंगालच्या विणकरांनी एक विशिष्ट प्रकारचे धोतर विणण्यास सुरुवात केली, ज्याच्या काठावर खुदिराम लिहिलेले होते आणि बंगालच्या तरुणांनी ते धोतर परिधान करून अभिमानाने स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली.

देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 11 ऑगस्ट रोजी नोंदवलेल्या इतर महत्त्वाच्या घटनांची मालिका पुढीलप्रमाणे, 

1347: अलाउद्दीन हसन गंगूने गादी ताब्यात घेतली आणि बहमनी राज्याची स्थापना केली.

1908: क्रांतिकारक खुदीराम बोस यांना फाशी देण्यात आली

कोलकाताचा मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड याच्यावर बॉंब हल्ला केल्याच्या आरोपाखाली खुदीराम बोसला (Khudiram Bose) फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रफुल्लकुमार चाकी याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या बॉंबहल्ल्यामध्ये किंग्जफोर्ड बचावला. पण या प्रकरणामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये मोठी दहशत पसरली होती. 11 ऑगस्ट 1908 रोजी खुदीराम बोस याला मिदनापूर तुरुंगात फाशीची शिक्षा दिली. 

1914: फ्रान्सने ऑस्ट्रिया आणि हंगेरीविरुद्ध युद्ध घोषित केले.

1929: पर्शिया आणि इराक यांच्यात मैत्रीचा करार झाला.

1940: जर्मनीने ब्रिटनच्या पोर्टलँड बंदरावर हवाई हल्ला केला.

1944: अमेरिकेने सुमात्रा बेटांच्या पालेमबांग भागावर हवाई हल्ला केला.

1960: आफ्रिकन देश चाडला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.

1961: दादर आणि नगर हवेली भारतात विलीन होऊन केंद्रशासित प्रदेश बनले

पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दादरा आणि नगर हवेली (Dadra and Nagar Haveli) हा प्रदेश 11 ऑगस्ट 1961 रोजी भारतात विलिन करण्यात आला. दादरा आणि नगर हवेली हा भारतातील आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी एक केंद्रशासित प्रदेश आहे. याच्या उत्तरेला गुजरात राज्य तर इतर तिन्ही दिशांना महाराष्ट्र राज्य आहे. 2011 च्या जनगणनेनुसार दादरा आणि नगर हवेलीची लोकसंख्या 3,42,853 एवढी होती तर क्षेत्रफळ 491 चौ. किमी आहे.

1970 : साली भारतीय महाराष्ट्रीयन मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि लेखिका इरावती कर्वे यांचे निधन.

1984: तत्कालीन सोव्हिएत रशियाने भूमिगत अणुचाचणी केली.

2003: नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन NATO ने अफगाणिस्तानमधील पीस फोर्सची कमांड घेतली.

2004: भारत आणि पाकिस्तानने वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीची देवाणघेवाण केली.

2012: इराणच्या ताब्रिझजवळ झालेल्या भूकंपात किमान 306 लोक ठार, 3,000 इतर जखमी.

2017: इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथे दोन प्रवासी गाड्या एकमेकांवर आदळल्या, किमान 41 लोक ठार आणि 179 जण जखमी झाले.

 

[ad_2]

Related posts