( प्रगत भारत । pragatbharat.com)
Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणाला वैज्ञानिक दृष्टिकोनासह ज्योतिषशास्त्रातही विशेष महत्त्व आहे. या वर्षातील 2023 मध्ये पहिलं सूर्यग्रहण हे 20 एप्रिल 2023 वैशाख अमावस्येच्या दिवशी होतं. ते भारतात दिसलं नव्हतं. आता वर्षाताली दुसरं सूर्यग्रहण अश्विन महिन्यातील पितृपक्ष अमावस्येला म्हणजे 14 ऑक्टोबरला आहे. या दिवशी दिसणाऱ्या ग्रहणाला कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे. (surya grahan 2023 in october these zodiac sign people face problem during solar eclipse Astrology news )
ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि चंद्रग्रहण हे अशुभ मानले जाते. त्यामुळे सूर्यग्रहणाच्या काही राशींसाठी संकट घेऊन आला आहे. आर्थिक, करिअर आणि मान सन्मानाला हानी पोहोचणार आहे. कुठल्या राशींसाठी सूर्यग्रहण धोकादायक आहे जाणून घ्या.
मेष (Aries)
सूर्यग्रहण मेष राशीच्या लोकांसाठी अनेक समस्या घेऊन येणार आहे. एवढंच नाही तर या काळात जाचकाची फसवणूक होण्याची शक्यता आहे. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, अन्यथा मोठ्या संकटात अडकाल. अशा परिस्थितीत नोकरी संदर्भात विचारपूर्व निर्णय घ्या. नोकरीमध्ये अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे.
वृषभ (Taurus)
दुसरं सूर्यग्रहण या राशीच्या लोकांचे आर्थिक नुकसान करणार आहे. मोठी धनहानी होणार आहे. त्याशिवाय जाचकाच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार आहे. या काळात बोलण्यावर अत्यंत संयम ठेवा. मौल्यवान वस्तूबद्दल निष्काळजी तुम्हाला महागात पडू शकते. तुमचा आत्मविश्वास ढासळणार आहे. कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदारी वाढणार आहे.
सिंह (Leo)
हे सूर्यग्रहण या राशीच्या लोकांसाठी धोकादायक आहे. हा काळ या राशीच्या लोकांसाठी अशुभ आहे. तुमची बदनामी होण्याची भीती आहे. अनावश्यक खर्च वाढणार आहे. त्यामुळे तुमचं बजेट कोलमडणार आहे. आर्थिकदृष्ट्या नुकसान सहन करावं लागणार असून गुंतवणुकीचा विचार करु नका. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या.
कन्या (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठीही हा काळ अशुभ असणार आहे. या काळात तुमचे मित्र तुम्हाला अडचणीत टाकणार आहे. एवढंच नाही तर तुम्हाला आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागणार आहे. या काळात सगळ्या गोष्टींची काळजी घ्या.
तूळ (Libra)
या राशीच्या लोकांसाठी हा काळ अशुभ असणार आहे. एवढंच नाही तर तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत करणार आहे. तणाव वाढणार असून तुमची चिडचिड होणार आहे. त्याच वेळी मानसिक स्थिती विचलित होण्याची भीती आहे. वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. या काळात आर्थिक नुकसान होणार आहे. मन शांत करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करणे फायदाचं होईल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)