Independence Day 2023 Pm Modi Will Make 2 Crore Lakhpati Didi Girls In Villages Will Be Trained To Operate Drones Know Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Modi Will Make 2 Crore Lakhpati Didi Girls in Villages: स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day 2023) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना अनेक नवीन योजनांचा उल्लेख करत देशाच्या प्रगतीबद्दल बोलले. त्याचबरोबर काही नव्या योजनांचीही मोदींनी घोषणा केली. यामध्ये शेतीला हायटेक करण्यापासून महिलांना पुढे नेण्यापर्यंतचा समावेश आहे. यावर्षी पंतप्रधान मोदींनी दोन कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याची घोषणा केली आहे.

पीएम मोदी म्हणाले की, “बँकांपासून ते अंगणवाड्यांपर्यंत असं एकही व्यासपीठ नाही की, ज्यामध्ये महिला योगदान देत नसतील. आता माझं स्वप्न गावांमध्ये 2 कोटी लखपती दीदी बनवण्याचं आहे. त्यासाठी आम्ही एक नवी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.” ज्यामध्ये 15 हजार महिला बचत गटांना ड्रोन चालवण्याचं आणि दुरुस्त करण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल. यामुळे ग्रामीण महिलांचं सक्षमीकरण होईल आणि देशाचं कृषी तंत्रज्ञान क्षेत्र मजबूत होईल.”

या योजनेंतर्गत पीएम मोदींनी कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान आणण्याबाबत बोललं आणि महिला सेल्फ ग्रुपच्या महिलांना ड्रोन चालविण्याचं प्रशिक्षण देण्याच्या योजनेबद्दल सांगितलं. शेतीच्या कामात ड्रोनची सेवा सुरू करण्याबाबत त्यांनी सांगितलं, जेणेकरून शेतकरी आणि कृषी समाज पुढे जाऊ शकेल.

पाहा व्हिडीओ : Independent Day Pm Modi Speech : भारतातील महिला जगात पुढे, 2 कोटी महिलांना लखपती बनवण्याचं स्वप्न

https://www.youtube.com/watch?v=Y1p5iaFgv_U

यासोबतच पंतप्रधान मोदी म्हणाले की, “माता, भगिनी आणि मुलींना मी सांगू इच्छितो की, माझ्या माता-भगिनींच्या बळावर आज देशाची प्रगती झाली आहे. आज देश प्रगतीच्या मार्गावर आहे, त्यामुळे हे सर्वांचेच प्रयत्न आहेत. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो.” होय, तुमच्या मेहनतीमुळेच आज देश कृषी क्षेत्रात प्रगती करत आहे.”

शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या या योजनेबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आम्ही पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात अडीच लाख कोटी रुपये जमा केले आहेत. प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचावं यासाठी आम्ही जल जीवन मिशनवर 2 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. आम्ही आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 70 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. गरिबांना औषधं मिळावीत, त्यांना चांगले उपचार मिळावेत. यासाठी आम्ही सुमारे 15 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. पशुधन वाचवण्यासाठी जवळपास 15 हजार कोटी रुपये लसीकरण योजनेसाठी दिले.”

यासोबतच पंतप्रधान मोदी म्हणाले की, “हा एक नवा भारत आहे. आत्मविश्वासानं भरलेला भारत, एक भारत जो आपले संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. म्हणूनच हा भारत.. थांबत नाही, थकत नाही, दमत नाही आणि हा भारत कधीच हरत नाही.”

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींकडून ‘विश्वकर्मा योजने’ची घोषणा; कधी सुरू होणार, कोणाला होणार फायदा?

[ad_2]

Related posts