Morning Headlines Breaking National State News Live Headlines Bulletin Morning 19th August 2023 Saturday

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

मोहिमेचं भविष्य आता ठरणार, चांद्रयान-3 चा चंद्राच्या अंतिम कक्षेच्या दिशेने प्रवास सुरु

श्रीहरिकोटा : भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम चांद्रयान-3 ही अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, विक्रम लँडरचा वेग कमी करण्यात आला असून चंद्राच्या कक्षेच्या दिशेने लँडरचा प्रवास सुरु झाला आहे. तसेच आतापर्यंतची सर्व परिस्थिती ही व्यवस्थित असल्याचं देखील इस्रोने म्हटलं आहे. तसेच चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग करण्यापूर्वी त्याचा वेग कमी करणं हे आव्हानात्मक असल्याचं इस्रोकडून सांगण्यात आलं आहे. वाचा सविस्तर

देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा, दिल्लीत सकाळपासून पावसाची संततधार सुरु

नवी दिल्ली : सध्या देशाच्या काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. विशेषत: उत्तर भारतात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं काही राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसर आज उत्तर भारतासह पूर्व आणि मध्य भारतातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वाचा सविस्तर

मणिपूरमध्ये हिंसाचारानंतर म्यानमारला पळालेल्या लोकांना सैन्याने आणले परत, मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी मानले आभार

मणिपूर : मणिपूरच्या सीमावर्ती भागातील जे लोक म्यानमारला पळून गेले होते अशा 212 जणांना सैन्याने पुन्हा देशात परत आणले आहे. सैन्याच्या या कामगिरीबद्दल मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी सुरक्षा दलाचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “3 मे पासून मणिपूरमध्ये जातीय दंगली सुरु आहेत. यामुळे मणिपूरच्या सीमावर्ती भागातील मोरेह शहरामधील अनेक लोक शेजारी असलेल्या म्यानमार देशात गेली होती. त्या 212 जणांना भारतीय सैन्याने सुखरुप त्यांच्या घरी आणले आहे.” वाचा सविस्तर

Lok Sabha Election 2024 : राहुल गांधी अमेठीमधून निवडणूक लढवणार, यूपी काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांची घोषणा

अमेठी : देशातील सर्व राजकीय पक्ष लोकसभा निवडणूक 2024 च्या तयारीला लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. यासोबत त्यांनी प्रियंका गांधी कोणत्या मतदारसंघातू लढण्याची शक्यता आहे, हेही सांगितलं आहे. वाचा सविस्तर

मुख्यमंत्र्यांसमोर फोनवर बोलणे अधिकाऱ्याला पडले महागात, प्रोटोकॉल भंग केल्याचा ठपका ठेवत थेट केली बदली

उत्तराखंड : मुख्यमंत्र्यांच्या प्रोटोकॉलचे पालन न करणे उत्तराखंडमधील एका अधिकाऱ्याला चांगले महागात पडले आहे. मुख्यमंत्र्याच्या प्रोटोकॉलचे पालन न केल्याने एका अधिकाऱ्याविरोधात कारवाई करण्यात आली असून त्याची बदली करण्यात आली आहे. त्याचे झाले असे की, मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यावेळी  तैनात असलेले एएसपी प्रोटोकॉल विसरले आणि फोनवर बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना सॅल्युट केले. त्यानंतर आता त्यांची बदली करण्यात आली आहे. उत्तराखंडचे मु्ख्यमंत्री पुष्कर सिंह धामी कोटद्वारमध्ये आलेल्या आपत्तीची पाहणी करण्यासाठी गेले होते, त्यावेळी हा प्रकार घडला. वाचा सविस्तर

मेष, मकर, कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला, फक्त ‘हे’ काम करु नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 19 August 2023 : आज शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीच्या लोकांची आज खास व्यक्तीशी भेट होईल. तर, सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाईल. व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. एकूणच, मेष ते मीन राशीसाठी आजचा शनिवार नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घेऊयात आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर

भारतीय नाण्याच्या उत्क्रांतीमध्ये पुढचं पाऊल, ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिले नाणे पाडले; आज इतिहासात

19th August In History : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाच्या असलेल्या नाण्यांचा इतिहास फार जुना आहे. इतिहासात आजचा दिवस हा देशातील आधुनिक नाण्याच्या उत्क्रांतीमध्ये पहिलं पाऊल ठरला होता. आजच्याच दिवशी म्हणजे 19 ऑगस्ट 1757 साली ब्रिटिश ईस्ट इंडियाने कोलकाता या ठिकाणी पहिल्या नाण्याची निर्मिती केली. ईस्ट इंडियाचे या नाण्याचा वापर बंगालमधील मुघल प्रांतात केला जायचा. बंगालच्या नवाबासोबत झालेल्या करारानुसार ईस्ट इंडिया कंपनीने 1757 साली ही टांकसाळ बनवली होती. त्यानंतर या नाण्याच्या वापरात वाढ होत गेली. नंतरच्या काळात ब्रिटिशांनी त्यामध्ये वेगवेगळे बदल केले. वाचा सविस्तर

आजपासून काश्मीर महिला क्रिकेट लीग, मुंबईत महिला बचत गटांसाठी आठवडी बाजारांची सुरुवात; आज दिवसभरात

19th August Headlines : आज दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या लोकसभा मतदारसंघ आढावा बैठकीचा पहिला टप्पा आज संपणार आहे. पुढील आठवड्यात दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. मुंबईत आजपासून महिला बचत गटांसाठी आठवडी बाजारांची सुरुवात होणार आहे. तर, दुसरीकडे आजपासून काश्मीर महिला क्रिकेट लीग श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. वाचा सविस्तर

[ad_2]

Related posts