Kota Latur Student Ended His Life Jee Mains 23 Students Took Extreme Step Rajsthan Education Pattern Marathi 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लातूर: राजस्थान येथील कोटा या शैक्षिणक शहरात एकाच दिवशी दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात लातूरचा आविष्कार कासलेचा (Kota Student Sucide) समावेश आहे. जेई परीक्षेची तयारी करणाऱ्या अविष्कारने आत्महत्या केल्यानंतर या परिसरातील लोकांना धक्काच बसला आहे. पण या घटनेनंतर आता कोटामध्ये नवीन आणि धक्कादायक पॅटर्न (Rajsthan Kota Education Pattern) आकारास येत असल्याचं समोर आलं आहे.या वर्षी 23 विद्यार्थ्यांनी आपली जीवनयात्रा फक्त अभ्यासाच्या अतिरिक्त ताणामुळे संपवली असल्याचं आकडेवारी सांगतेय. 

राजस्थानातील कोटा हे शहर भारताचे शैक्षिणक हब म्हणून ओळखले जाते. संपूर्ण भारतातून विद्यार्थ्यांचा ओढा हा कोटा शहराकडे असतो. त्याला कारणे ही तशीच आहेत. मागील अनेक वर्षापासून जेई मेन्स आणि ॲडव्हान्समध्ये कोटा येथील विद्यार्थी टॉप आले आहेत. याच कारणामुळे येथे अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या तीन लाखाच्या घरात आहे. 

या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून इथल्या खासगी क्लासेसना मोठा आर्थिक फायदा होत असून त्यांची वार्षिक दहा हजार कोटी रुपयांची उलाढाल येथे होत असते. याच ठिकाणी अनेक नावजलेल्या खासगी कोचीग क्लासचे टोलेजंग कॅम्पस आहेत. हजारो विद्यार्थी येथे भारतभरातून येत असतात. येथे फक्त विद्यार्थ्यांत स्पर्धा नाहीच तर खासगी कोचिग क्लासमध्येही तीव्र स्पर्धा आहेत. यातून मग आमचाच रिझल्ट टॉप लागला हे सिद्ध करण्यासाठी रेस लागली आहे. 

क्लासेसच्या हे प्रेशर येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर येत असते. दर आठवड्याला होणारी परीक्षा, महिन्याची होणारी परीक्षा अशी तयारी या ठिकाणी करून घेतली जाते. मग त्यात योग्य गुण न घेणाऱ्या विद्यार्थ्यांवरील ताण वाढत जातो. यातून या ठिकाणी शिकायला येणारे विद्यार्थी आत्महत्या करत असल्याचं समोर येत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी, 

– 2015 साली 18 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.
– 2016 साली 16 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.
– 2017 साली 07 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. 
– 2018 साली 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.
– 2019 साली 18 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. 
– 2022 साली 15 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. 

या वर्षी आतापर्यंत 23 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याला अपवाद होता तो कोविड काळातला. कोरोनाच्या 2020 आणि 2021 साली एकही आत्महत्येची नोंद झालेली नाही.

महाराष्ट्रातूनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कोटाला शिक्षण घेण्यासाठी जात असतात. अविष्कार संभाजी कासले हाही एक ते सव्वा वर्षापूर्वी कोट्याला शिक्षणासाठी गेला होता. त्याचा मोठा भाऊ कोटा येथेच शिकला होता. आयआयटीला मोठ्या भावाचा नंबर लागला होता. त्यामुळे आविष्कारकडून ही तशाच अपेक्षा होत्या. अविष्कारचे आई-वडील दोघेही अहमदपूर तालुक्यात शिक्षक म्हणून काम करतात. अहमदपूर तालुक्यातील उजना या गावचे ते मूळ रहिवासी आहेत. अविष्कारने रविवारी कोटा येथे सहाव्या माळ्यावरून उडी मारत आत्महत्या केली होती. अविष्कारच्या मृत्यूची बातमी गावात आल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आज उशिरा त्याचा मृतदेह कोठ्यावरून उजना या मूळ गावी आणण्यात येणार आहे.
       
अतिशय हुशार असलेल्या अविष्कारने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचललं असेल याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. कोटा येथील कोचिंग क्लासेसमध्ये असणाऱ्या अविष्कारला अभ्यासाचा ताण सहन झाला नाही. यामुळे तो डिप्रेशन मध्ये गेला होता का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 

कोटा या ठिकाणी 24 तासांत दोन विद्यार्थ्यांना आत्महत्या केल्याने नव्याने एज्युकेशन पॅटर्नचा विचार करण्याची वेळ आल्याचं बोललं जातंय. 

ही बातमी वाचा :

[ad_2]

Related posts