[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई: जे ग्राहक पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी येतात आणि त्यांनी जर दोन हजार रुपयांची नोट दिली तर त्या ग्राहकाला माघारी पाठवू नका असं आवाहन कंसोर्टियम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्स (CIPD) या संस्थेने देशातील सर्व पेट्रोल-डिझेल डिलर्सना केलं आहे. आरबीआयने 30 सप्टेंबरनंतर 2000 रुपयांची नोट चलनातून बाद होणार असल्यांचं जाहीर केल्यानंतर पेट्रोल पंप डीलर्सनी ग्राहकांकडून ती नोट घेण्यास नकार दिल्याचं चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर सीआयपीडीने हे आवाहन केलं आहे.
कंसोर्टियम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्स (CIPD) ही देशभरातील 60,000 हून अधिक इंधन आउटलेटचे प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे. आरबीआयच्या घोषणेनंतर अनेक ठिकाणी दोन हजारांच्या नोटा स्वीकारण्यास नकार देण्यात येत आहे. लोकांनी त्यांच्याकडील नोटा या कोणत्याही मार्गाने खपवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर या नोटा जास्त प्रमाणात दिल्या जात असल्याचं चित्र आहे. पण अनेक डीलर्सनी त्यांच्या पंपावर दोन हजारांच्या नोटा न स्वीकारण्याची भूमिका घेतली आहे. तशा प्रकारचा बोर्डही लावण्यात आले आहेत.
CIPD ने त्याच्या एका निवेदनात म्हटलं आहे की, इंधन आउटलेटने ग्राहकांना कळवावे की जर त्यांनी 1000 रुपयांच्यापेक्षा जास्त इंधन टाकलं तरच 2,000 ची नोट स्वीकारण्यात येईल. डिजिटायझेशनमुळे, बहुसंख्य रिटेल आउटलेटमधील रोख व्यवहारांचे प्रमाण कमी झाले आहे. जे ग्राहक ₹ 2,000 च्या नोटांमध्ये ₹ 10,000 पेक्षा जास्त पैसे भरतात त्यांचे केवायसी रेकॉर्ड डीलर्सनी ठेवावे, असे त्यात म्हटले आहे.
व्यापाऱ्यांनी त्यांच्या दैनंदिन व्यवहार केलेल्या व्यवसाय मूल्यापेक्षा जास्त रोख रक्कम जमा करू नये. त्यांच्या दैनंदिन व्यवहाराच्या मूल्यापेक्षा जास्त रोख रक्कम बँकांमध्ये, विशेषतः 2,000 मूल्यांमध्ये जमा केल्यास, आयकर (IT) विभागाकडून छाननी केली जाईल. त्यामुळे डीलर्सनी त्यांच्या सामान्य दैनंदिन सरासरी ठेव मर्यादेपेक्षा 2,000 च्या नोटा जमा करण्याबाबत सावध असले पाहिजे असं या निवेदनात म्हटलं आहे.
Reels
CIPD ने 2016 मध्ये नोटाबंदीनंतर आय-टी विभागातील अनेक डीलर्सना सामोरे जावे लागलेल्या छाननीचा विचार करून, RBI आदेशाच्या संवेदनशीलतेबद्दल सरकारी तेल विपणन कंपन्यांकडे देखील मुद्दा उचलला आहे.
तरच नोट स्वीकारली जाईल…
दरम्यान दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक वाहन चालक पन्नास शंभर रुपयांचे पेट्रोल भरण्यासाठी पंपावर येतात आणि दोन हजार रुपयांची नोट देऊन जातात. त्यांना दोन हजार रुपयांचे सुटे पैसे दिले जात असले तरी पंप चालकांकडे या नोटा वाढत असल्याने आता त्यांनी दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे पेट्रोल खरेदी करायचे असेल तरच, दोन हजार रुपयांची नोट स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या वाढल्याने हा निर्णय घेतला असल्याचे नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स वेल्फेअर असोसिएशने स्पष्ट केलं आहे.
ही बातमी वाचा:
[ad_2]