[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
जालना : येथील घटना गंभीर आहे. संकटात असलेल्या लोकांना दिलासा देण्याची गरज आहे. हवा तसा बळाचा वापर जालना येथील घटनेत करण्यात आला. आंदोलनात काही मार्ग निघेल याची चर्चा सुरू होती, सर्व व्यवस्थित सुरू असताना पोलिसांना सूचना आल्या आणि पोलिसांनी निर्णय बदलून सरळ सरळ बळाचा वापर करत लाठी हल्ला केला. मुंबईहून आदेश आल्यावर पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला आहे.
जालना येथे घडलेला प्रकार अतिशय गंभीर आहे. हा प्रकार जालना जिल्ह्यापुरता मर्यादित न रहाता इतर ठिकाणी पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज आम्ही तिघांनी इथे हॉस्पिटल मध्ये जाऊन भेट दिली, जखमी लोकांना भेटलो. आश्चर्य वाटेल असा बळाचा वापर या ठिकाणी करण्यात आला. स्त्रिया लहान मुले यांना सुद्धा पाहिले नाही. आंदोलनात काही मार्ग निघेल याची चर्चा सुरू होती, सर्व व्यवस्थित सुरू असताना पोलिसांना सूचना आल्या आणि पोलिसांनी निर्णय बदलून सरळ सरळ बळाचा वापर करत लाठी हल्ला केला. हवेत गोळीबार करून ज्वारीच्या साईजचे छरे जखमींना लागले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या काळात, त्या मंत्रिमंडळात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, असेही शरद पवार म्हणाले.
[ad_2]