लेप्‍टोस्‍पायरोसिसची कारणे, लक्षणे व उपचार, बदलत्या हवामानामुळे वाढलाय धोका

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) पावसाळा कडाक्‍याचे ऊन आणि उकाड्यापासून आल्‍हाददायी दिलासा देतो. पण या आनंदासह पावसाळ्यामध्‍ये संसर्गाचा प्रसार देखील होतो, विशेषत: पावसाळ्यादरम्‍यान व्‍यक्‍तीची रोगप्रतिकारशक्‍ती तुलनेने कमी असते. ओलाव्‍यामुळे जीवाणू व विषाणू देखील अधिक प्रमाणात वाढतात, ज्‍याचा अनेक व्‍यक्‍तींचे, विशेषत: रोगप्रतिकारशक्‍ती कमकुवत असलेल्‍या व्‍यक्‍तींचे आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍यावर प्रतिकूल परिणाम होतो.पावसाळ्यात पसरणाऱ्या काही सामान्य संसर्गांमध्ये डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, सर्दी आणि गॅस्‍ट्रोइंटेस्‍टाइनल समस्या यांचा समावेश आहे. लेप्टोस्पायरोसिस हा पावसाळ्यामध्‍ये पसरणारा आजार नसला तरी वेळेवर उपचार न केल्‍यास प्राणघातक ठरू शकतो. याबाबत अधिक माहिती दिली आहे माहीम येथील फोर्टिस सहयोगी हॉस्पिटल एस एल रहेजा हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसनीचे कन्स्लंटंट डॉ. निखिल कुलकर्णी यांनी. (फोटो सौजन्य – iStock)

[ad_2]

Related posts