‘इंडिया’ आघाडीकडून सनातन धर्माचा अवमान, अमित शहांनी विरोधकांना सुनावलं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वृत्तसंस्था, डुंगरपूर (राजस्थान): मतपेढी व तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी विरोधकांच्या इंडिया आघाडीने सनातन धर्माचा अवमान केला आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथे केली. सनातन धर्म म्हणजे करोना विषाणू व डासांमुळे होणाऱ्या मलेरिया, डेंग्यू या तापांप्रमाणे आहे, असे वादग्रस्त विधान तमिळनाडूचे युवाकल्याण मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केले होते.

राजस्थानमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या परिवर्तन यात्रेच्या उद्घाटनादरम्यान झालेल्या जाहीर सभेत शहा यांनी उदयनिधी यांच्या विधानाचा समाचार घेतला. उदयनिधी हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आहेत.

विरोधी पक्षांतर्फे करण्यात आलेल्या इंडिया आघाडीचा द्रमुक हा घटकपक्ष आहे. द्रमुकच्या उदयनिधी यांनी केलेल्या या विधानाप्रकरणी शहा यांनी या आघाडीस लक्ष्य केले. ‘सनातन धर्माचे उच्चाटन व्हायला हवे, अशी भाषा इंडिया आघाडीतील पक्ष करीत आहेत. यामध्ये स्टॅलिन यांच्या पुत्राचाही समावेश आहे. राहुल गांधी यांनी हिंदू संघटनांची तुलना लष्कर-ए-तोयबाशी केली होती. देशात हिंदुंचा दहशतवाद सुरू आहे, असे या आघाडीतील काही मंत्री म्हणतात. केवळ मतपेढीचे राजकारण व तुष्टीकरण साध्य करण्यासाठी हे सर्वजण या प्रकारची वक्तव्ये करीत आहेत. यातून त्यांनी सनातन धर्माचा अवमान केला आहे,’ असे शहा म्हणाले.

‘विरोधकांच्या आघाडीचे नाव इंडिया आघाडी असे असले तरी प्रत्यक्षात ते घमंडिया गठबंधन असे असायला हवे. मतपेढीच्या राजकारणासाठी ते कोणत्याही थराला जातील. ते सनातन धर्माचा अवमान करत आहेत; परंतु सनातन धर्माच्या विरोधात ते ज्या प्रमाणात बोलतील, त्या प्रमाणात त्यांचे बळ कमी होत जाईल, हे त्यांनी ध्यानात ठेवावे,’ असा इशारा शहा यांनी दिला.

धर्म एकच, कधीही बदलत नाही, तो जगण्याचा नियम; सरसंघचालक मोहन भागवतांनी सांगितली व्याख्या

‘निवडणुकीत मोदींचा विजय झाला तर देशात सनातन धर्माचे राज्य येईल, असा दावा विरोधक करतात; परंतु सनातन धर्मसंस्कृती तर लोकांच्या मनावर राज्य करत आहे आणि हा देश लोकशाहीच्या आधारेच मार्गक्रमण करेल, हे मोदी यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे,’ याकडे शहा यांनी लक्ष वेधले. ‘काँग्रेसने राम मंदिराची निर्मिती रोखण्याचा अनेक वर्षे प्रयत्न केला परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मोदींनी तेथे भूमिपूजन केले व आता रामजन्मभूमीवर भव्य मंदिर उभारले जात आहे. इंडिया आघाडी त्यास रोखू शकत नाही,’ असेही शहा म्हणाले.

स्टॅलिन यांच्या विधानाचा भाजपचे नेते, विश्व हिंदू परिषदेनेही निषेध केला आहे. स्टॅलिन यांची वक्तव्ये ही चिथावणीखोर असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला आहे. स्टॅलिन यांचे विधान वैयक्तिक स्वरूपाचे आहे, अशी प्रतिक्रिया छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री टी. एस. सिंग देव यांनी व्यक्त केली.

‘सनातन धर्म समानताविरोधी’

चेन्नई : सनातन धर्म हा समानता व सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. सनातन धर्म म्हणजे करोना विषाणू व डासांमुळे होणाऱ्या मलेरिया, डेंग्यू या तापांप्रमाणे असल्याने त्याचे उच्चाटन व्हायला हवे, असे विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी केले होते. तमिळनाडू प्रोग्रेसिव्ह रायटर्स अँड आर्टिस्ट असोसिएशनच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘सनातन म्हणजे शाश्वत. त्यात काहीही बदल करता येत नाही. त्याविरोधात कोणी प्रश्न विचारू शकत नाही. या धर्माने जातीच्या आधारावर लोकांची विभागणी केली आहे,’ असा आरोप स्टॅलिन यांनी केला होता. पेरियार आणि डॉ. आंबेडकर यांनी सनातन धर्माचा सखोल अभ्यास केला होता व या धर्माचा समाजावर कशाप्रकारे नकारात्मक परिणाम होतो यावर लेखनही केले आहे, असे ते म्हणाले.

कोट

‘इंडिया’ आघाडी देशाच्या संस्कृती आणि परंपरेवर हल्ला करून विष कालवत असून, द्वेष पसरविण्याचे काम करीत आहे. मुंबईतील बैठकीत सनातन धर्मावर हल्ला करण्याचा कट रचला होता का? त्यांना सनातन धर्म संपवायचा आहे. नष्ट करायचा आहे. सनातन धर्माच्या विरोधात असणाऱ्या अशा आघाडीला फेकून द्या.

जे. पी. नड्डा, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप

Madha Loksabha: माढ्यात भाजपला फटका बसणार? मोहिते Vs निंबाळकर संघर्षामुळे जागा धोक्यात, फडणवीस काय करणार?

[ad_2]

Related posts