Unemployment In India Is Higher Than Pakistan China America Are Also Lagging Behind Unemployment Rate In India

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : कोरोना काळापासून (Corona) जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेवर (Economy) परिणाम झाला आहे. कोरोनामुळे जगाची अर्थव्यवस्था (World Economy) काहीशी संथ झाल्याचं पाहायला मिळत आहे.  जगभरात महागाईही वाढता दिसत आहे. यासोबतच बेरोजगारीही (Unemployment) वाढत असल्याचं चित्र आहे. संपूर्ण जग मंदीच्या भीतीच्या सावटाखाली जगत आहे. जागतिक मंदीच्या भीतीमुळे जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचं सांगितलं जात आहे. कोविड महामारी आणि रशिया युक्रेन युद्धाचा जगाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे जगात महागाई आणि त्यासोबत बेरोजगारी वाढत असल्याचं म्हटलं जात आहे. 

कंगाल पाकिस्तानपेक्षाही भारतात बेरोजगारी अधिक

कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक देशांसमोर आर्थिक आव्हानंही निर्माण झाली आहेत. अनेक देशांमध्ये मंदीची भीती व्यक्त केली जात आहे. महासत्ता अमेरिका, युके, जर्मनी यासारख्या देशांमध्ये मंदीची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे जागतिक मंदीची भीतीही व्यक्त केली जात आहे. परिणामी जगभरात बेरोजगारीमध्येही वाढ झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे कंगाल झालेल्या पाकिस्तानपेक्षाही भारतात बेरोजगारी वाढली आहे.

कोणत्या देशात सर्वात बेरोजगारी?

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या माहितीनुसार, जगातील सर्वाधिक बेरोजगारी असलेला देश दक्षिण आफ्रिका आहे. दक्षिण आफ्रिकेत बेरोजगारीचा दर 32.6 टक्के आहे. बेरोजगारीच्या यादीत इराक दुसऱ्या क्रमांकावर आहे. इराकमध्ये बेरोजगारीचा दर 15.55 टक्के आहे. सर्वाधिक बेरोजगारीच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर बोस्निया आणि हर्जेगोविना हे देश असून येथे बेरोजगारीचा दर 13.3 टक्के आहे. या यादीत अफगाणिस्तान चौथ्या आणि स्पेन पाचव्या क्रमांकावर आहे.  



[ad_2]

Related posts