FIR Against Editors Guild Members,’एडिटर्स गिल्ड’च्या सदस्यांविरोधात FIR; मणिपूरमध्ये संघर्ष भडकविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप – fir against editors guild members accused of trying to incite conflict in manipur

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वृत्तसंस्था, इम्फाळ : ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’चे (ईजीआय) अध्यक्ष आणि तीन सदस्यांविरोधात आपल्या सरकारने एफआयआर दाखल केला असल्याचे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी सोमवारी सांगितले. या चौघांनी राज्यात संघर्ष भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.

‘एडिटर्स गिल्ड’च्या अध्यक्ष सीमा मुस्तफा; तसेच वरिष्ठ पत्रकार सीमा गुप्ता, भारत भूषण आणि संजय कपूर यांनी ७ ते १० ऑगस्ट या कालावधीत मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराच्या प्रसारमाध्यमांनी केलेल्या वार्तांकनाचा अभ्यास करण्यासाठी राज्याचा दौरा केला होता.

‘मणिपूरमधील हिंसाचारात बरेच लोक मारले गेलेले आणि बेघर झालेले असताना, एडिटर्स गिल्डने मणिपूरसमोरील संकटाची जटीलता, पार्श्वभूमी आणि राज्याचा इतिहास समजून न घेताच पूर्णपणे एकतर्फी वृत्त अहवाल प्रकाशित केला. जे विष पेरण्यासाठी आले होते, ते राज्यविरोधी, देशद्रोही आणि प्रस्थापितविरोधी आहेत. मला आधी कळले असते, तर त्यांना राज्यात येऊच दिले नसते,’ असे मुख्यमंत्री सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, ‘गेल्या चार महिन्यांपासून वांशिक हिंसाचाराला तोंड देणाऱ्या मणिपूरबाबतच्या प्रसारमाध्यमांच्या वृत्तांकनावर ‘एडिटर्स गिल्ड’ने गेल्या आठवड्यात प्रकाशित केलेल्या एका वृत्त अहवालात टीका केली आहे. त्यात असे म्हटले आहे की, मणिपूर हिंसाचाराबाबत काही प्रसारमाध्यमांनी एकतर्फी वृत्तांकन केले. हिंसाचाराच्या काळातील इंटरनेटवरील बंदी माध्यमांच्या वार्तांकनासाठी हानिकारक असल्याची टीकाही केली आहे. हिंसाचाराच्या काळात राज्याचे नेतृत्व पक्षपाती झाल्याचे संकेत मिळाल्याचा दावाही या वृत्त अहवालात केला आहे. त्यामुळे या वृत्त अहवालाद्वारे मणिपूरमध्ये आणखी हिंसाचार निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याबद्दल ‘एडिटर्स गिल्ड’च्या सदस्यांविरोधात राज्य सरकारने एफआयआर दाखल केला आहे.’
Manipur Kuki: इम्फाळमध्ये आता एकही कुकी उरला नाही, चिदंबरम म्हणाले, ‘वंशसंहार पूर्ण झाला’
‘एफआयआर’ मागे घेण्याची मागणी

नवी दिल्ली : ‘एडिटर्स गिल्ड’च्या अध्यक्षांसह सत्यशोधन समितीमधील तीन सदस्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याच्या मणिपूर सरकारच्या कृतीचा ‘प्रेस क्लब ऑफ इंडिया’ने (पीसीआय) निषेध केला आहे. ‘राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी शांतिदूताला गोळ्या घालण्याचा हा प्रकार आहे. चौघांविरोधातील एफआयआर ताबडतोब मागे घेण्याची मागणी आम्ही करीत आहोत,’ असे ‘पीसीआय’ने प्रसृत केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

[ad_2]

Related posts