इंडिया आघाडीच्या मोठ्या बैठकांना आता पूर्णविराम; आता फक्त समन्वय समिती, इतर समित्यांच्या बैठका होणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

I.N.D.I.A Alliance: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. गेल्या काही दिवसांत विरोधकांच्या इंडिया आघाडीनं देशातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये बैठकांचं आयोजन केलेलं. सर्वात आधी इंडिया आघाडीची बैठक पाटण्यात पार पडली, मग बंगळुरू आणि त्यानंतर मुंबईत पार पडली. इंडिया आघाडीची चौथी बैठक भोपाळमध्ये होणार असल्याचं बोलंल जात होतं, पण आता भोपाळमध्ये बैठक होणार नसल्याचं समोर आलं आहे. इंडिया आघाडीच्या आता मोठ्या बैठका होणार नसून अशा मोठ्या बैठकांना पूर्णविराम देण्याचा निर्णय इंडिया आघाडीनं घेतल्याची माहिती मिळत आहे. 

इंडिया आघाडीच्या मोठ्या बैठकांना आता पूर्णविराम देण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे. चेन्नई, कोलकाता अशा इतर राज्यात आता बैठका होणार नसल्याची माहिती मिळत आहे. आता केवळ समन्वय समिती आणि इतर समित्यांच्या बैठका होणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता 13 सप्टेंबरला शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक होणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.  

[ad_2]

Related posts