Mamata Banerjee Announces West Bengal Mla Ministers Salary Hike News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आमदारांच्या पगारात घसघशीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमधील आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या पगारात (West Bengal MLA Salary Hike) आता दरमहा 40 हजार रुपयांची वाढ केली. पश्चिम बंगालमधील आमदारांना मिळणारे वेतन हे इतर राज्यांच्या तुलनेत कमी असल्याने आता त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपण मात्र आपल्या पगारात कोणतीही वाढ केलेली नाही असं ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेनंतर आता आमदारांचा पगार हा 10 हजारावरून 50 हजार इतका होणार आहे. तर राज्यमंत्र्यांचा पगार हा 10,900 वरून 50,900 इतका तर कॅबिनेट मंत्र्यांचा पगार हा 11,000 वरून 51,000 इतका होणार आहे. त्याचसोबत आमदार आणि मंत्र्यांना मिळणाऱ्या इतर सुविधा आणि भत्ते हे कायम राहणार आहेत. 

आमदारांना भत्त्यासह एकूण किती रक्कम मिळणार? 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या या नव्या घोषणेनंतर आता आमदारांना वेतन आणि भत्त्यांसह मिळणारी वास्तविक रक्कम आता 81,000 रुपये प्रति महिना या दरावरून 1.21 लाख रुपये इतकी होईल असे राज्य सरकारच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्याचप्रमाणे आतापासून मंत्र्यांना मिळणारी मासिक रक्कम ही 1.10 लाख रुपये प्रति महिना वरून सुमारे 1.50 लाख रुपये प्रति महिना होईल.

 

गुरुवारी राज्याच्या विधानसभेत वाढीव वेतनाची घोषणा करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) म्हणाल्या की, “पश्चिम बंगालमधील आमदारांचे पगार इतर राज्यातील आमदारांच्या पगारापेक्षा खूपच कमी आहेत, हे लक्षात घेऊन पगारवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या वेतनात मात्र कोणतीही वाढ करण्यात आली नाही.”

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांची भत्ता वाढवण्याची मागणी

मात्र मंत्री आणि आमदारांच्या या वाढलेल्या पगारामुळे राज्य सरकारी कर्मचारी त्यांच्या वेतनात वाढ करावी अशी मागणी करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्यानंतर राज्यानेही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी करत आहेत. 

ही बातमी वाचा: 



[ad_2]

Related posts