PM Narendra Modi And Us President Joe Biden Meeting Key Points Of Joint Statement

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली:  जी-20 परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आज, शुक्रवारी सायंकाळी राजधानी दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी भारत-अमेरिकेत द्विपक्षीय चर्चा झाली. दोन देशांमध्ये झालेल्या द्विपक्षीय बैठक सकारात्मक झाली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. या बैठकीत संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीमध्ये कायम सदस्यत्व, चांद्रयान-3 मोहिमेबाबतही चर्चा झाली. दोन्ही देशांच्यावतीने संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. 

दोन्ही देशांमध्ये काय चर्चा झाली?

दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी करून म्हटले आहे की 2024 मध्ये भारताने आयोजित केल्या जाणाऱ्या क्वाड गटाच्या बैठकीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे स्वागत करण्यास भारत उत्सुक आहेत. 2024 च्या सुरुवातीच्या महिन्यांत क्वाड सदस्य देशांची बैठक आयोजित केली जाणार आहे. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश या क्वाड गटात आहे.

पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीत बायडन यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायम सदस्यत्वाला पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 या अंतराळ मोहिमेबाबतही अभिनंदनही केले.

संयुक्त निवेदनानुसार, राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी अमेरिकेकडून 31 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याबाबत भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या विनंती पत्राचे स्वागत केले. 

द्विपक्षीय बैठकीत दोन्ही नेत्यांनी मजबूत जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळी तयार करण्यावर भर दिला. या अंतर्गत Microchip Technology Inc. भारतात व्यवसाय आणि संशोधन वाढवण्यासाठी 300 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करेल. याशिवाय Advanced Micro Devices ने पुढील 5 वर्षात भारतात 400 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. दोन्ही नेत्यांनी जून 2023 मध्ये अमेरिकन कंपन्यांनी मायक्रोन, एलएएम रिसर्च आणि अप्लाइड मटेरिअल्सने केलेल्या घोषणेच्या अंमलबजावणीबद्दल समाधान व्यक्त केले.

संयुक्त निवेदनात काय म्हटले?

भारत आणि अमेरिकेने संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, बायडन यांनी भारताच्या G-20 अध्यक्षपदाचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी आणि बायडन यांनी G-20 साठी त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. G-20 परिषदेचे समान उद्दिष्ट्ये साध्य करू, असा विश्वास दोन्ही देशांनी व्यक्त केला.  

द्विपक्षीय चर्चेत अमेरिकेचे अर्थमंत्री जेनेट येलेन, परराष्ट्र सचिव अँथनी ब्लिंकन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन हे उपस्थित होते. तर भारतीय शिष्टमंडळात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा समावेश होता.



[ad_2]

Related posts