[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : मागील काही दिवसांपासून पुण्याचे दादा कोण? (Pune) अशा चर्चा रंगल्या असतानाच आज त्याचा पुढचा अध्य़ाय पाहायला मिळाला. चंद्रकांत पाटील कार्यक्रमाला येणापूर्वीच अजित पवारांनी कार्यक्रम सुरु केल्याने अजित पवार (Ajit Pawar) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यामध्ये पुन्हा एकदा कुरघोडीचं राजकारण घडल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहे. पुण्यातील कार्यक्रम चंद्रकांत पाटील कार्यक्रमाला यायच्या आधीच अजित पवारांनी कार्यक्रम सुरु केला आणि हा कार्यक्रम सुरु केल्यामुळे चंद्रकांत पाटील यांनीही मिश्किल भाषेत अजित पवारांवर टीका केली आहे.
पुणे जिल्हा परिषदेकडून गुणवान विद्यार्थी शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत. या कार्यक्रमास पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम पत्रिका आणि स्टेजवरील फ्लेक्सवर चंद्रकांत पाटील यांचे नावही आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांच्या येण्याच्या आधीच अजित पवारांनी कार्यक्रम सुरु केला होता. कार्यक्रमाची वेळ दहा वाजताची होती. कार्यक्रमास उशीर होत असल्याने अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांसाठी न थांबता कार्यक्रमास सुरुवात केली. अजित पवारांनी भाषण देखील सुरु केलं होतं. यांच्यामध्ये पुन्हा एकदा कुरघोडीचं राजकारण घडल्याच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या आहे.
यावेळी अजित पवारांनी उपस्थितांना आरोग्याचे सल्लेदेखील दिले. अजित वेळेत उठा, चांगल्या सवयी लावा, कामाला लवकर सुरुवात करा, कार्यक्रमास वेळेत पोहचा. उगीच ढेरी सुटलीय अस नको. हा सल्ला माझ्यासह सगळ्यांना आहे, असं ते म्हणाले. मात्र याच कार्यक्रमात चंद्रकांत पाटील उशीरा पोहचले होते. त्यामुळे त्यांनादेखील अजित पवार बोलले असावेत, अशाही चर्चा रंगल्या आहेत.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
ओरखडा न येऊ देता, चिमटा काढायचा, असा अजित पवारांचा स्वभाव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या सुचनेचं पालन करावं. अजित दादांना भाषणातून जे सांगायचं होतं. तेच मलाही सांगायचं आहे. अजित पवारांच्या भाषणाला मम म्हणतो, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांच्या कृत्याला उत्तर दिलं आहे.
पालकमंत्री अजित पवार की चंद्रकांत पाटील?
मागील काही दिवसांपासून सातत्याने अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांच्या कुरघोडीच्या चर्चा रंगू लागल्या आहे. दोघांचाही पुण्याच्या पालकमंत्री पदावर डोळा आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी पुणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसत आहे. पुण्यात प्रशासकीय बैठका घेण्याचा धडाका अजित पवारांनी लावला आहे. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्रीपद जरी भाजपच्या चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे असले तरी अजित पवार सुपर पालकमंत्री असल्यासारखे वागताना दिसत आहेत. मागील आठवड्यात अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पुणे महापालिका आयुक्त, पीएमआरडीएचे आयुक्त अशा अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. या बैठकांना चंद्रकांत पाटील यांना निमंत्रण नव्हतं. त्याआधी देखील अजित पवारांनी अशा बैठका घेण्याचा सपाटा लावला होता.
इतर महत्वाच्या बातम्या :
Nana Patekar : शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरुन नाना पाटेकरांनी मुनगंटीवारांना डिवचलं; म्हणाले, “भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पाहा”
[ad_2]