Aza Ekadashi 2023 : अजा एकादशीला दुर्मिळ शुभ संयोग! तिथी, शुभ मुहूर्त, व्रताचं महत्त्व जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Aza Ekadashi 2023 : हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व असून वर्षभरात 24 एकादशी येतात. यंदा अधिक मास आल्यामुळे दोन एकादशी अधिक आल्या आहेत. कृष्ण आणि शुक्ल अशा दोन एकादशीचं व्रत पाळलं जातं. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला अजा एकादशी (Aja Ekadashi 2023,) असं म्हणतात. एकादशीचं व्रत हे रविवारी 10 सप्टेंबर 2023 पाळलं जाणार आहे. श्रावण महिन्यातील ही एकादशी अतिशय खास आहे. विष्णू आणि भगवान भोलेनाथाची एकत्र पूजा केली जाणार आहे. त्याशिवाय दुर्मिळ असा योगही जुळून आला आहे. (Aza Ekadashi 2023 date time shubh muhurat pooja time vrat tithi in marathi)

अजा एकादशी तिथी (Aza Ekadashi Date)

पंचांगानुसार एकादशी तिथीला सुरुवात – 9 सप्टेंबर 2023 संध्याकाळी 7.17 वाजेपासून 
एकादशी समाप्त – 10 सप्टेंबर 2023 रात्री 9:28 पर्यंत असणार आहे. 
पारायण वेळ – 11 सप्टेंबर 2023 सकाळी 6:04 मिनिटांपासून सकाळी 8:33 मिनिटांपर्यंत 

अजा एकादशी 2 शुभ संयोग!

यावर्षी अजा एकादशीला दोन शुभ संयोग जुळून आले आहेत. यादिवशी रवि पुष्य योग आणि सर्वार्थ सिद्धी योग असणार आहे. 
रवि पुष्य योग – 10 सप्टेंबर 2023  संध्याकाळी 05:06 वाजेपासून  11 सप्टेंबर 2023 सकाळी 6:04 वाजेपर्यंत
सर्वार्थ सिद्धि योग –  10 सप्टेंबर 2023  संध्याकाळी 05: 06 वाजेपासून  11 सप्टेंबर 2023 सकाळी 6:04 वाजेपर्यंत

अजा एकादशी पूजा साहित्य 

विष्णुजींची मूर्ती अथवा फोटो 
फूलं 
नारळ
सुपारी 
फळं
लवंग
दिवा
तूप 
पंचामृत
तुळस 
चंदन
मिठाई 

अजा एकादशी पूजा (Aza Ekadashi Pooja)

अजा एकादशीला सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. 
मंदिर आणि पूजास्थळ स्वच्छ करून भगवान विष्णूची मूर्ती स्थापित करावी.
व्रताचं संकल्पना घ्यावी. त्यानंतर भगवान विष्णूच्या पूजेमध्ये फुलं, नारळ, सुपारी, फळं, लवंगा, अगरबत्ती, तूप, पंचामृत भोग, तुळस, तुपाचा दिवा, डाळी आणि चंदन ठेवा.
विष्णूजींची पूजा आणि आरती करा.
व्रताची कथा वाचा. 
दुसऱ्या दिवशीपर्यंत उपवास ठेवा. 
गरजूंना अन्नदान करून दक्षिणा द्या. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts