मुंबई-गुवाहाटी इंडिगो फ्लाइटमध्ये महिला प्रवाशासोबत गैरवर्तन, झोपेत असतानाच…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mumbai Guwahati IndiGo Flight: रिक्षा, बस, ट्रेन यामध्ये महिलांच्या छेडछाडीचे प्रकरणे अनेकदा समोर आले आहेत. मात्र, आता विमान प्रवासही महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. विमानात पुन्हा एकदा असाच एक प्रकार समोर आला आहे. मुंबई-गुवाहाटी जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटमध्ये एका व्यक्तीने महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर महिलेच्या तक्रारीनंतर या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, एअरलाइनने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रवाशाला अटक केले आहे. तर, एअरलाइनने यासंदर्भात काही माहितीही दिली आहे. 

इंडिगो एअरलाइनने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून-गुवाहाटी येथे जाणाऱ्या विमानात सहप्रवाशाने महिलेची छेड काढली असून तक्रार मिळाल्यानंतर महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीला गुवाहाटी पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे. रविवारी ही घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, विमानात महिला कॉर्नरसीटवर बसली होती. त्यावेळी तिच्या बाजूला बसलेल्या पुरुष सहप्रवाशाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा विमानात लाइट कमी होती आणि महिला झोपली होती तेव्हा बाजूला बसलेल्या प्रवाशाने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्याने अनेकवेळा चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. सुरुवातीला तिने दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला मात्र सहप्रवाशाची कृत्ये थांबतच नव्हती. त्यानंतर अखेर सहन करण्यापलीकडे गेल्यानंतर महिलेने या प्रकरणाची तक्रार केली. महिलेने आरोप केला आहे की, तिच्या शेजारी बसलेल्या प्रवाशाने रात्री विमानातील केबिन लाइट मंद झाल्यावर त्या व्यक्तीने तिचे मनगट घट्ट पकडले होते. तसंच, ती झोपेत असताना तिला वारंवार झोपेत स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार तिने केली आहे.

महिलेने केलेल्या आरोपानंतर त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला गुवाहाटी पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे. इंडिया विमान क्रमांक 6E-5319 यात रात्री साधारण 9 वाजता मुंबईहून रवाना झाले होते. तेव्हा मध्यरात्री ही घटना घडली आहे. गेल्या दोन महिन्यात विमानात घडलेली ही चौथी घटना आहे. 

दरम्यान, महिलेने आरोपीला रंगेहाथ पकडल्यानंतर त्याने माफी मागण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने केबिन क्रुला बोलवून आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्यानंतर महिलेने CISF, एअरलाइन आणि एअरपोर्ट अधिकाऱ्यांना व पोलिसांनाही धन्यवाद दिले आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा विमानप्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे का? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

Related posts