‘शत्रु’ पिता-पुत्र शनि-बुध आमनेसामने! ‘या’ 4 राशी होणार श्रीमंत, तुमची रास यात आहे का?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Budh and Shani : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र यांचं गोचर अतिशय महत्त्वपूर्ण असतं. ग्रह गोचरमुळे जाचकाच्या आयुष्यावर सकारात्मक तर काही राशींवर नकारात्मक परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रात बुध, सूर्य आणि शनि ग्रहाला विशेष महत्त्व आहे. लवकरच शनि देव आणि बुध म्हणजे शत्रु पिता पुत्र एकमेकांसमोर भ्रमण करणार आहेत. हे दोन्ही सप्तमात एकमेकांपासून प्रवास करतील. 18 सप्टेंबर 2023 पासून शनि आणि बुध एकत्र येत एक विशेष स्थिती निर्माण करणार आहे. शनि आणि बुधाची ही स्थिती 4 राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. यात तुमच्या रासीचा समावेश आहे का जाणून घ्या. (budh and shani gochar saturn and mercury will change 4 zodiac signs they get immense money)

शनि आणि बुधामुळे या राशींचं भाग्य चमकणार

मेष (Aries Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी शनि आणि बुध यांचं समोरासमोर होणारे संक्रमण खूप जास्त फलदायी ठरणार आहे. या लोकांसाठी प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. आर्थिक लाभ होणार असल्याने आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तुमची योजना यशस्वी होणार आहे. काही समस्यातून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे.

वृषभ (Taurus Zodiac) 

सप्तमात शनि आणि बुधाची चाल या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे. या लोकांना नवीन नोकरीची संधी लाभणार आहे. तुमच्या करिअरमध्ये मोठी प्रगती होणार आहे. नोकरीत तुम्हाला काही नवीन जबाबदारी देण्यात येणार आहे. तुमचं काम पूर्ण होण्यास हा काळ उत्तम असणार आहे. कुटुंबात सुख-शांती नांदणार आहे. रखडलेली कामं पूर्ण होणार आहे.  

 मिथुन (Gemini Zodiac)

शनि आणि बुधाचे समोरासमोर येणे मिथुन राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. लेखन आणि साहित्याशी निगडित लोकांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. परदेशातून लाभ होण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत तुम्हाला बढती किंवा वाढ मिळण्याचे योग आहेत.

तूळ (Libra Zodiac)

सप्तम राशीतून शनि आणि बुधाचे भ्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. नशिबाच्या जोरावर सर्व काही मिळणार आहे. कामं पूर्ण होणार आहे. अकाउंट्स, टेक्निकल, सीए, ग्लॅमर, मीडिया आणि मोठ्या व्यावसायिकांसाठी हा काळ सुवर्णकाळ असणार आहे. हा काळ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा ठरणार आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts