Pune Crime News Use Of Food Delivery App For Drug Sales 5 People Arrested Lsd Stamp Drugs Worth 53 Lakhs Seized

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime News : पुण्यातील पठ्ठ्यांनी अमली (Pune Crime news) पदार्थांची विक्री करण्यासाठी नवी शक्कल लढवण्याचा प्रयत्न केला मात्र पुणे पोलिसांनी त्यांचा हा प्लॅन उघडकीस आणला आहे. पुण्यातील रस्त्यांवर फूडची डिलिव्हरी करणारे अनेक डिलिव्हरी बॉय दिसतात. रात्रंदिवस ते फूड डिलिव्हरी करतात. त्यामुळे त्यांच्याकडे कधीही संशयाने पहिलं जात नाही. याच सगळ्याचा फायदा एका अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळीने घेतला आहे. अंमली पदार्थ पोहोचवण्यासाठी चक्क डंझो अॅपचा वापर करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून त्यांच्याकडून 51 लाख 60 हजार रुपयांचे 17 ग्रॅमचे LSD Stamps चे 1,032 तुकडे, इतर ऐवज असा 53 लाख 35 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

रोहन दीपक गवई  (वय 24, रा. डि पी रोड, कर्वे पुतळा, कोथरुड), सुशांत काशिनाथ गायकवाड (वय 36, रा. बाणेर, मुळ कोडोली, सातारा – Satara), धीरज दीपक लालवाणी  (वय 24, रा. पिंपळे सौदागर), दीपक लक्ष्मण गेहलोत (वय 25, रा. सनसिटी रोड), ओंकार रमेश पाटील  (वय 25, रा.वाकड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

डंझो ऑनलाईन डिलिव्हरी अ‍ॅपद्वारे अंमली पदाथार्ची खरेदी-विक्री

कोथरुड आणि परिसरात डंझो ऑनलाईन डिलिव्हरी अ‍ॅपद्वारे एलएसडी या अंमली पदाथार्ची खरेदी विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रोहन गवई याला पकडून त्यांच्याकडून 90 हजार रुपयांचे एलएसडी जप्त केले होते. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याचे इतर साथीदारही असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याच्या साथीदारांना बाणेर, सिंहगड रोड, पिंपळे सौदागर, वाकड परिसरातून अटक केली आहे. त्यातील गवळी हा पुण्यात MBA चं शिक्षण घेत आहे. गायकवाड हा इंजिनियर आहे आणि बाकी दोघांनीही चांगलं शिक्षण घेतलं आहे. 

कशी करायचे अंमली पदार्थांची डिलिव्हरी?

या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे. या सगळ्या तरुणांना पॉर्टी आणि बाकी शौक पुरवण्यासाठी हा धंदा सुरु केल्याचं चौकशीत पुढे आलं आहे. धीरज, दीपक आणि ओंकार या यातील लिडर आहेत. व्हॉटसअ‍ॅपद्वारे संपर्क (WhatsApp) साधल्यानंतर डिलिव्हरी देण्यासाठी ते फूड अ‍ॅपद्वारे ऑर्डर बुक करत होते. त्यानंतर समोरील व्यक्तीने ऑर्डर दिल्यानंतर ते डिलिव्हरी बॉयकडे पार्सल पॅक करुन देत होते. या पार्सलमध्ये काय आहे, हे डिलिव्हरी बॉयला माहिती नसायचं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या सगळ्यांकडून एकून 53 लाखांचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. 

[ad_2]

Related posts