Lok Sabha Election 2024 India Alliance Coordination Committee First Meeting Agenda And Issues To Be Addressed Knoe Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India Alliance Coordination Committee Meeting:इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स‘ (I.N.D.I.A.) च्या कोआर्डिनेशन कमेटीची (समन्वय समिती) पहिली बैठक बुधवारी (13 सप्टेंबर) होणार आहे. या बैठकीच्या अजेंड्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या प्रचारासाठी जागावाटपाचा फॉर्म्युला आणि रणनीती यावर व्यापक चर्चा होणार असल्याचं मानलं जात आहे.

समन्वय समितीमध्ये विविध विरोधी पक्षांच्या 14 नेत्यांचा समावेश आहे. समितीची बैठक सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी होणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, सुत्रांनी सांगितलं की, अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी लोकसभा जागांवर भाजप उमेदवारांच्या विरोधात विरोधी पक्षांकडून संयुक्त उमेदवार उभा केला जावा, यासाठी जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच तयार करण्याची मागणी केली आहे.

जागावाटपाचा फॉर्म्युला कसा ठरवला जाईल?

असा फॉर्म्युला अंमलात आणण्यासाठी पक्षांना आपला अहंकार आणि स्वार्थ सोडावा लागेल, असं अनेक नेत्यांचं मत आहे. जागावाटपाचे निकष काय असतील? याबाबत सध्या कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. नुकत्याच लागलेल्या निवडणुकीचे निकाल पाहता कोणत्याही जागेवर पक्षांची कामगिरी विचारात घेतली जाईल, असं मानलं जात आहे. या बैठकीत जागावाटपाचा मुद्दा निश्चित झाला नसला तरी त्यावर विचार केला जाईल, असं याबाबत माहिती असलेल्या एका सूत्रानं सांगितलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपशी टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते निवडणूक प्रचारावरही मोठा खर्च करतील. 

तीन गोष्टी सोडाव्या लागतील : आप नेते राघव चढ्ढा 

बैठकीपूर्वी समन्वय समितीचे सदस्य आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांनी बोलताना सांगितलं की, लोकांपर्यंत पोहोचणं, संयुक्त रॅलीचं नियोजन करणं आणि घरोघरी प्रचार करणं यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल, जी प्रत्येक राज्यासाठी वेगळी असेल. राघव चढ्ढा म्हणाले की, ही आघाडी यशस्वी करण्यासाठी त्यात सामील असलेल्या प्रत्येक राजकीय पक्षाला महत्त्वाकांक्षा, मतभेद आणि मतभिन्नता या तीन गोष्टींचा त्याग करावा लागेल.

इंडिया आघाडीच्या समन्वय समितीमध्ये ‘या’ नेत्यांचा समावेश 

‘इंडिया’ आघाडीच्या समन्वय समितीत, ज्याला निवडणूक रणनीती समिती असंही संबोधलं जातं, तिच्या सदस्यांमध्ये काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल, डीएमके नेते टीआर बालू, जेएमएम नेते हेमंत सोरेन, शिवसेना (ठाकरे गटाचे) नेते संजय राऊत, आरजेडी नेते तेजस्वी यांचा समावेश आहे. यादव, आप नेते राघव चढ्ढा, समाजवादी पक्षाचे नेते जावेद अली खान, जेडीयू नेते लालन सिंह, सीपीआय नेते डी राजा, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला, पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती, टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी आणि सीपीआय-एमचा एक सदस्य.

‘या’ नेत्यांना बैठकीला उपस्थित राहता येणार नाही

TMC नेते अभिषेक बॅनर्जी यांना बुधवारी (13 सप्टेंबर) अंमलबजावणी संचालनालयानं चौकशीसाठी बोलावलं आहे, त्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत, तर जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह प्रकृती अस्वास्थ्यामुळे बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. जेडीयू नेते आणि बिहारचे मंत्री संजय कुमार झा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. माकपनं अद्याप आपल्या कोणत्याही नेत्याला या समितीचे सदस्य म्हणून नामनिर्देशित केलेलं नाही आणि ते बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 16-17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सीपीआय-एम पॉलिटब्युरोच्या बैठकीत पक्ष आपल्या युतीतील सदस्याबाबत निर्णय घेईल.

I.N.D.I.A. नं तिसऱ्या बैठकीनंतर काय म्हटलं? 

जूनमध्ये पाटणा येथे झालेल्या विरोधी आघाडीच्या पहिल्या बैठकीत प्रत्येक जागेवरून बलाढ्य उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचवेळी मुंबईत झालेल्या महायुतीच्या तिसर्‍या बैठकीनंतर 1 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या प्रस्तावात असं म्हटलं होतं की, शक्य तितके पक्ष एकत्र निवडणुका लढवतील आणि वेगवेगळ्या राज्यांतील जागा वाटपाबाबत शक्य तितक्या लवकर निर्णय घेतले जातील.  

[ad_2]

Related posts