( प्रगत भारत । pragatbharat.com)
प्रवाशांसाठी महत्वपूर्ण सूचना!
आम्ही प्रवाशांना कळवू इच्छितो की मागाठाणे मेट्रो स्थानकाच्या उत्तरेकडील प्रवेश आणि निर्गमन व्दार प्रवाशांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहेत. काही अपरिहार्य कारणामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे प्रवेशद्वार बंद करण्यात आल. होतं. आपणांस झालेल्या… pic.twitter.com/XUTpoLJTZS
— Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@MMMOCL_Official) September 12, 2023
जुलैमध्ये मागाठाणे मेट्रो स्थानकालगत एका खासगी विकासकाच्या कामादरम्यान रस्ता खचल्याची घटना घडली होती.
मेट्रो स्थानकाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारालगत हा रस्ता असल्याने मेट्रो स्थानकाचा काही भाग बाधित झाला होता. त्यामुळे महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) जुलैमध्ये बाधित परिसर बंद केला होता. स्थानकाच्या उत्तरेकडील एका प्रवेशद्वाराचा त्यात समावेश होता.
या घटनेनंतर मेट्रो स्थानकातील बाधित परिसराची आयआयटीकडून तपासणीही करण्यात आली होती. दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेने या रस्त्याची, परिसराची दुरुस्ती केली.
मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वारही आता सुरक्षित झाले आहे. त्यामुळे हे प्रवेशद्वार पुन्हा प्रवाशांसाठी खुले करण्यात आल्याची माहिती एमएमएमओसीएच्या अधिकाऱ्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
हेही वाचा
दादर लोकल परेल स्टेशनवरुन सुटणार, पहा टाईमटेबल
जादा शुल्क आकारणाऱ्या बसचालकांविरोधात तक्रार करा, व्हॉट्सअॅप क्रमांक जारी