Baramulla Encounter Marathi News Started Between Terrorists And Army Police In Uri Hathlanga

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Baramulla Encounter : जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) उरी, बारामुल्ला येथे दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. लष्कर आणि पोलिसांनी परिसरात शोधमोहीम (Search Operation) सुरू केली आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सोशल मीडिया साइट X (पूर्वीचे ट्विटर) वर याबाबत माहिती दिली आहे की, लष्कर आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी एका दहशतवाद्याला ठार केले आहे.

 

 

हातलंगा भागात दहशतवाद्यांशी चकमक सुरू
काश्मीर दक्षिण क्षेत्र पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे, लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईचा भाग म्हणून उरीच्या हातलंगा भागात दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे. यामध्ये जवानांनी दहशतवाद्यांना घेरले होते, त्यापैकी एक दहशतवादी मारला गेला आहे. असं पोलीसांकडून समजते.

दहशतवाद्यांच्या कारवायांवर लक्ष
तर अनंतनागच्या कोकरनागमध्येही जवानांनी दहशतवाद्यांविरोधात शोधमोहिम हाती घेतली आहे. चौथ्या दिवशीही सुरक्षा दलांची कारवाई सुरूच आहे. दहशतवाद्यांच्या कारवायांवरही आकाशातून लक्ष ठेवण्यात येत आहे. अनंतनागच्या डोंगराळ भागातील जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेतली जात आहे. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह म्हणाले की, या भागात लपलेल्या प्रत्येक दहशतवाद्याचा खात्मा केला जाईल.

उंचावरून दहशतवाद्यांकडून गोळीबार 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनागच्या डोंगराळ भागात लपलेले दहशतवादी उंचावरून गोळीबार करत आहेत. या चकमकीत लष्करातील एक कर्नल, एक मेजर, जम्मू-काश्मीर पोलीस डीएसपी आणि एक जवान शहीद झाला आहे. या घटनेनंतर पॅरा कमांडोना तत्काळ पाचारण करण्यात आले. इथल्या डोंगराळ भागात दहशतवादी जास्त उंचीवर लपून बसल्याने त्यांचे नेमके ठिकाण निश्चित होत नाही, तसेच ते त्यांचे ठिकाण सतत बदलत असतात. दहशतवादी उंचीवर असल्याने कारवाईदरम्यान लष्कर आणि पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात ते यशस्वी झाले, ज्याचा परिणाम लष्करी जवान शहीद झाले.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Anantnag Encounter : अनंतनागमध्ये सापडला जवानाचा मृतदेह, शहीद जवानांची संख्या आता 4 वर, पोलीसांचा खबरी निघाला देशद्रोही

 [ad_2]

Related posts