What Is Significance Of Pictures Printed On The Back Of Indian Note Every Rupee Has Different Story

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rupee Note: जगातील बहुतांश देशांचं स्वत:चं चलन (Currency) आहे. भारतीय चलन हे रुपयांमध्ये असतं. भारतात एक रुपयांपासून ते दोन हजार रुपयांच्या नोट्या चलनात आहेत आणि काळानुसार काही नोटा चलनातून बादही करण्यात आल्या आहेत. पण यातील प्रत्येक नोटेवर काही ना काही चित्रं किंवा फोटो होते, नोटांवरील या चित्रांच्या आणि फोटोंमागे काही ना काही इतिहास असतो. 

प्रत्येक नोटेच्या मागील बाजूस विविध स्मारकं, प्राणी, ठिकाणं, मंदिरं आणि व्यक्तींचे फोटो छापलेले असतात. देशाची संस्कृती आणि जैवविविधता जगाला दाखवणं हा नोटेवर फोटो छापण्याचा मूळ उद्देश आहे. एक रुपयाच्या नोटेपासून सुरू होणाऱ्या भारतीय नोटांच्या मागील बाजूस छापलेल्या फोटोंबद्दल जाणून घेऊयात…

एक रुपयाची नोट

पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतात प्रथमच एक रुपयाची नोट छापण्यात आली होती. त्यापूर्वी देशात पाचव्या जॉर्जचा फोटो छापलेलं एक रुपयाचं चांदीचं नाणं चलनात होतं, पण पहिल्या महायुद्धामुळे चांदीच्या नाण्यांचा पुरवठा कमी झाला आणि त्यामुळे सरकारने 30 नोव्हेंबर 1917 रोजी एक रुपयाची नोट छापली. एक रुपयाची नोट आरबीआय छापत नाही, तर ती अर्थ मंत्रालयाद्वारे छापली जाते. या नोटेच्या पुढच्या बाजूला एक रुपयाच्या नाण्याचं चित्र होतं आणि नोटेच्या मागील बाजूस तेल शोधणाऱ्या समुद्रातील जहाजाचं चित्र होतं.

दहा रुपयांची नोट

1 रुपयांपासून 10 रुपयांपर्यंतच्या नोटा एकामार्फत दुसऱ्याकडे बराच काळ फिरत राहतात आणि त्यामुळेच त्या लवकर खराब होतात. ही समस्या सोडवण्यासाठी सरकारने या रुपयांची नाणी बनवण्याचा निर्णय घेतला.

जुन्या दहा रुपयांच्या नोटेच्या पुढच्या बाजूला महात्मा गांधी, अशोक स्तंभ, तर नोटेच्या मागील बाजूस गेंडा, हत्ती आणि वाघाचं चित्र आहे. नवीन दहा रुपयांच्या नोटेच्या उलट बाजूस कोणार्क सूर्य मंदिराच्या चाकांचा फोटो आणि स्वच्छ भारतचा लोगो आहे. 10 रुपयांची नोट छापण्यासाठी सुमारे 96 पैसे खर्च येतो.

पन्नास रुपयांची नोट

50 रुपयांची नोट छापण्यासाठी अंदाजे 20 रुपये खर्च येतो. सध्या 50 रुपयांच्या 1, 81, 4000 दशलक्ष नोटा चलनात आहेत. नोटेच्या मागील बाजूस महात्मा गांधींचं चित्र, अशोक स्तंभ आणि भारतीय संसदेचा फोटो आहे, जो भारताच्या मजबूत लोकशाहीचं प्रतिनिधित्व करतो. नव्या नोटेच्या उलट बाजूस ‘स्वच्छ भारत’ लोगो आणि हम्पी (कर्नाटक) हे ठिकाण आहे. हंपी हे भारतातील जागतिक वारसा स्थळ आहे.

शंभर रुपयांची नोट

ही नोट छापण्यासाठी 1.20 रुपये खर्च आला असून या मूल्याच्या 16,000 दशलक्ष नोटा बाजारात चलनात आहेत. या नोटेच्या पुढच्या बाजूला महात्मा गांधी आणि अशोक स्तंभाचा फोटो आहे, तर या नोटेच्या उलट बाजूस भारतातील सर्वोच्च पर्वत कांचनजंगा पर्वताचा फोटो आहे.

पाचशे रुपयांची नोट

2016 मध्ये नोटाबंदीनंतर 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांची जागा 500 रुपयांच्या नव्या नोटांनी घेतली. नवीन पाचशेच्या नोटांच्या छपाईसाठी अंदाजे 2.94 रुपये खर्च येतो. या नोटेच्या उलट बाजूस ‘स्वच्छ भारत’ आणि दिल्लीच्या ‘लाल किल्ल्या’चे चित्र आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Deadline End in September: 30 सप्टेंबरपूर्वी ‘ही’ कामं कराच, नाहीतर होईल मोठं नुकसान; तुमच्या आर्थिक व्यवहारांवरही होईल परिणाम

[ad_2]

Related posts