[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
ABP C Voter Survey: केंद्रात मोदी सरकारने (Modi Government) त्यांच्या नऊ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या नऊ वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या कामांचा आढावा भाजपकडून (BJP) करण्यात आला तर विरोधकांकडून यावर चांगलीच टीका देखील करण्यात आली. आता एका वर्षानंतर लोकसभेच्या निवडणुकाचं बिगुल वाजणार आहे. त्यामुळे आता पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती सत्ता जाणार का? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. एका बाजूला विरोधी पक्षांकडून एकजूट निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, तर भाजपाकडून केंद्रात सत्तेची हॅट्ट्रिक मारण्याची तयारी सुरु आहे.
याच पार्श्वभूमीवर एबीपी न्यूजसाठी सी-वोटरने एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणामध्ये पंतप्रधान पदाच्या पसंतीचा सवाल करण्यात आला होता. पंतप्रधान पदासाठी भाजपचे नरेंद्र मोदी की काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी यापैकी कोणाला मतदान कराल? हा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना 56 टक्के लोकांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पसंती दर्शवली आहे. तर 35 टक्के लोकांनी राहुल गांधींच्या नावाला पसंती दर्शवली आहे. तर पाच टक्के लोकांनी कोणालाही पसंती दर्शवली नाही आहे. चार टक्के लोकांनी निश्चित सांगता येणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकानंतर देशात पुढील पंतप्रधान कोण होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
पंतप्रधान मोदी की राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी कोणाला पसंती?
नरेंद्र मोदी – 56 टक्के
राहुल गांधी – 35 टक्के
दोन्ही नाही – 5 टक्के
माहीत नाही – 4 टक्के
Reels
विरोधकांचा एकजूटीचा प्रयत्न
भाजपविरोधात एकजूट करण्याचा प्रयत्न सध्या विरोधकांकडून करण्यात येत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट झाली. तसेच आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्रीदेखील विरोधी पक्षांच्या भेटी घेत आहेत. तूर्तास तरी विरोधकांकडून एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
भाजपची रणनिती काय?
केंद्रातील सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याने 31 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजस्थानचा दौरा करतील. इथूनच भाजप त्यांच्या विशेष अभियानाची सुरुवात करणार आहे. या अंतर्गत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्यासह अनेक दिग्गज नेते देशभरात त्यांचे कार्यक्रम करतील. हे कार्यक्रम म्हणजे भाजपाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याचे म्हटले जात आहे.
[ad_2]