[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
छत्रपती संभाजीनगर : शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात बाळाला जन्म देणारी मुलगी अल्पवयीन अविवाहित असल्याचे कळताच याची माहिती पोलिसांना देण्यात आली. दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसांनी घाटीत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तरुणीचा जबाब नोंदवून प्रियकराविरुद्ध बलात्कार आणि पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहर पोलिसांकडून हा गुन्हा मध्य प्रदेशातील निवाली (ता. शेंदवा, जि. बडवाणी) पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. लोकेश आसाराम सोळुंके (वय 23 वर्षे) असे प्रियकराचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, पीडिता मध्य प्रदेशातील आहे. दहावीत असताना तिची लोकेश सोळंके सोबत ओळख झाली. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दरम्यानच्या काळात पीडितेच्या मैत्रिणीच्या किरायाच्या खोलीत दोघांच्या भेटी होऊ लागल्या. याच काळात दोघांमध्ये शरीरसंबंध आल्याने पीडिता गर्भवती राहिली. ही माहिती तिने लोकेशला दिली असता, आपण पोलिस भरतीचा पेपर देणार आहे. त्यानंतर लग्न करतो, असे सांगून तो निघून गेला. त्यानंतर तो पीडितेकडे फिरकलाच नाही.
दरम्यान, पीडिताने लोकेशची तीन महिने त्याची वाट पाहिली. मात्र, तो काही परत आला नाही. या काळात तिचा गर्भ आठ महिन्यांचा झाल्यावर अखेर आई-वडिलांनी तिला बाळंतपणासाठी बहिणीकडे छत्रपती संभाजीनगरात पाठविले. तर, तिच्या बहिणीने 19 सप्टेंबरला तिला घाटीत दाखल केले. तेथे तिचे नाव आणि वय नोंदविल्यानंतर ती 18 वर्षे 1 महिन्यांची असल्याचे स्पष्ट झाले. 18 व्या वर्षीच बाळंतीण होत असल्यामुळे अल्पवयीन असताना ती गर्भवती राहिली, हे स्पष्ट होताच डॉक्टरांनी ही माहिती पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी जबाब घेऊन आकाश सोळंकेविरुद्ध गुन्हा नोंदविला. मात्र, अत्याचाराची घटना मध्य प्रदेशात घडली असल्याने गुन्हा तिकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी पुढील तपास मध्यप्रदेश पोलीस करणार आहे.
प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल
आरोपी आकाश आणि पिडीत तरुणीमध्ये आधी मैत्री आणि त्यानंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. दरम्यान, या काळात दोघेही लपूनछपून भेटू लागले. याच काळात दोघांमध्ये शरीरसंबंध आले. त्यामुळे मुलगी गर्भवती राहिली. याबाबत तिने आकाशला सांगितले. पण आपण लवकरच नोकरीला लागणार असून, पोलीस भरतीचे पेपर देण्यासाठी जात असल्याचे सांगितले. तेथून आल्यावर आपण लग्न करू असे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतर तो परत आलाच नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पिडीत मुलीच्या लक्षात आले. त्यानंतर तिच्या तक्रारीवरून प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Chhatrapati Sambhaji Nagar : रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या महिलेसोबत घडलं भयंकर; गावालगतच्या विहिरीत आढळला मृतदेह
[ad_2]