गौरीचा ओवसा भरण्यासाठी सुपात कोणती पानं, किती भाज्या वापरायच्या? Video पाहा आणि लक्षात ठेवा!

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gauri Aagman 2023: राज्यात गणेशोत्सवाचे जल्लोषात (Ganeshotsav 2023) आगमन झाले आहे. उद्या गुरुवारी गौराईचे आगमन होणार आहे. प्रत्येक राज्यभरात गौराईच्या आमगनाची वेगवेगळी प्रथा असते त्यानुसार गौराईचा नैवेद्यही तसाच केला जातो. कोकणातील गौरी-गणपतीचा उत्सवतर पाहण्यासारखा असतो. कोकणात गौरीपूजनाच्या अनेक पारंपारिक प्रथा व विधी प्रचलित आहे. त्यातीलच एक पद्धत म्हणजे गौरीचा ओवसा, नवववधूने ओवसा भरण्याची परंपरा साजरी केली जाते. ओवसा भरण्याची पद्धतही वेगळी आहे. आज आपण ओवसा म्हणजे काय आणि तो कसा भरायचा हे जाणून घेणार आहात. (Gauri Aagman 2023)

गणपतीनंतर गौराईचे आगमन होते. महाराष्ट्रात विविध प्रकारच्या गौरींची स्थापना केली जाते. खड्याच्या, फुलांच्या, उभ्या गौरी, जेष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन महालक्ष्मी तर कुणा  कुणाकडे  फक्त एकच गौरी घरी येते. गौरी दोन दिवसांच्या पाहुणचारासाठी माहेरपणाला येते. काही ठिकाणी माहेरवाशिणीच्या हातून गौरी बसवण्यात येतात. तर, कोकणात गौरी पूजनाच्या दिवशी ओवसा भरण्याची पद्धत आहे. जाणून घेऊया गौरीच्या ओवसा कधी व कसा भरावा. 

लग्नानंतर नववधूने पूर्व नक्षत्रांत पहिला ओवसा करण्याची पद्धत आहे. गौरीला एकदा ओवसा भरल्यानंतर दरवर्षी गौरीसमोर ओवसा करायची पद्धत आहे. नववधूने पहिला ओवसा भरला नसेल तर पूर्वा नक्षत्र येईपर्यंत ओवसा भरण्याची वाट पाहिली जाते. त्यामुशं नववधूसाठी ओवसा महत्त्वाचा असतो.

ओवसा म्हणजे काय?

एका सुपात ५ प्रकारच्या भाज्या, ५ प्रकारच्या वेलींची पाने, ५ प्रकारची फळे, करंडा फणी, ओटी (खण व नारळ) आणि वाणाच्या पानावर सुटे पैसे असे सर्व प्रत्येक सुपात ठेवून, अशी ५ सुपे गौरीच्या पुढ्यात ओवसा भरण्यासाठी ठेवतात.

ओवसा कसा भरायचा जाणून घेऊया

ओवसा भरण्यासाठी जी सूप वापरायची आहेत ती बांबूपासून तयार केलेली असावीत. पाच सूपांचा ओवसा भरला जातो. या सुपांना दोऱ्याच्या सहाय्याने गुंडाळून हळदीकुंकू लावले जाते. त्यानंतर पाच प्रकारच्या वेलींची पाने (हळद, काकडी,कारंदे,पडवळ,कारले) घेऊन त्यात रानभाज्या किंवा पाच फळे/ सुकामेवा/ धान्य या पैकी काहीही एक प्रकार ठेवला जातो. त्यानंतर सुपात विड्याचे पान, तांदूळ नारळ ठेवून गौरी समोर ठेवतात. 

ओवसा करुन झाले कि सर्व जोडपी आपल्या पेक्षा मोठ्या माणसांच्या पाया पडून ओवश्यातले पान वाण म्हणून देतात आणि सर्व मोठी मंडळी त्याबदल्यात पैसे, साडी किंवा सोन्या-दागिन्याचा वाण देतात. 

Related posts