Kia Seltos 2023 Kia Gets Over Fifty Thousand Booking In Just Two Months For Their New Kia Seltos

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Kia Seltos Booking: किया इंडियाला (Kia India) फक्त 2 महिन्यांत नवीन किया सेल्टोससाठी (Kia Seltos) 50,000 पेक्षा जास्त बुकिंग मिळाल्या आहेत. कंपनीने जुलै 2023 मध्ये नवीन सेल्टोस लाँच केला, जी लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. यासह, किया सर्वात स्पर्धात्मक मध्यम आकाराच्या SUV विभागातील सर्वात वेगाने वाढणारी ओईएम बनली आहे.

नवीन किया सेल्टोसचे किती बुकिंग?

सप्टेंबर महिन्यापर्यंत, कियाने 4 लाख देशांतर्गत विक्री आणि 1.47 लाख निर्यातीसह एकूण 5.47 लाख सेल्टोसची विक्री केली आहे. कंपनीचा दावा आहे की, एसयूव्हीच्या टॉप व्हेरियंटला सर्वाधिक मागणी आहे. एकूण बुकिंगपैकी सुमारे 77% बुकिंग टॉप व्हेरियंटसाठी (HTX पुढील) आहेत. याशिवाय, प्रगत प्रणालीसह सुसज्ज व्हेरियंटसाठी एकूण बुकिंगपैकी सुमारे 47% बुकिंग (Kia Seltos Booking) प्राप्त झाले आहेत.

इंजिन आणि किंमत

किया सेल्टोसमध्ये (Kia Seltos) 3 इंजिन पर्याय मिळतात, ज्यात 1.5L NA पेट्रोल, 1.5L टर्बो डिझेल आणि 1.5L टर्बो पेट्रोल समाविष्ट आहे. हे टेक-लाईन, जीटी लाईन आणि एक्स-लाईन या 3 ट्रिम स्तरांवर सादर केलं गेलं आहे. नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल व्हर्जनची किंमत 10.89 लाख ते 16.59 लाख रुपये आहे, तर टर्बो पेट्रोल व्हर्जनची किंमत 14.99 लाख ते 19.99 लाख रुपये आहे. सेल्टोसच्या डिझेल मॉडेलच्या बेस व्हेरिएंटची किंमत 11.99 लाख रुपये आहे, तर टॉप-स्पेक व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 19.99 लाख रुपये आहे.

कंपनीने काय म्हटलं?

सेल्टोसच्या यशाबद्दल बोलताना, किया इंडियाचे चीफ सेल्स आणि बिझनेस ऑफिसर म्युंग-सिक सोहन म्हणाले, “सेल्टोस ही नवीन युगातील ग्राहकांसाठी सर्वात विश्वासार्ह आणि आरामदायी ड्रायव्हिंग अनुभव बनली आहे. कारमध्ये त्याच्या किमतींनुसार डिझाईन आणि तंत्रज्ञानाचा एक अनोखा मिलाफ आहे आणि हेच तिच्या सर्वाधिक मागणीमागील एक प्रमुख कारण आहे. प्रचंड मागणी पाहता प्रतीक्षा कालावधी कमीत कमी ठेवण्यासाठी आम्ही आमचं उत्पादन देखील वाढवलं ​​आहे, जेणेकरून आमच्या ग्राहकांना त्यांची आवडती SUV खरेदी करण्यासाठी जास्त वेळ थांबावं लागणार नाही.

फिचर्स

ही SUV 15 सेफ्टी फिचर्स आणि 17 ADAS लेव्हल 2 ऑटोनॉमस फिचर्ससह येते. या ADAS तंत्रज्ञानामध्ये फ्रंट कोलिशन वॉर्निंग असिस्ट, एमरजेंसी ब्रेकिंग, लेन असिस्ट, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग आणि इतर अनेक फिचर्स समाविष्ट आहेत. इतर सेफ्टी फिचर्सप्रमाणे, या SUV ला सहा एअरबॅग्ज, ESC, हिल-स्टार्ट असिस्ट, ऑल-व्हील डिस्क ब्रेक, TPMS आणि थ्री-पॉइंट सीट बेल्ट मिळतात. याशिवाय यात ड्युअल स्क्रीन पॅनोरामिक डिस्प्ले, ड्युअल-झोन फुल ऑटोमॅटिक एसी आणि ड्युअल पॅन पॅनोरामिक सनरूफ आहे. ही SUV ह्युंडाई क्रेटा (Hyundai Creta), मारुती सुझुकी ग्रँड विटारा (Maruti Suzuki Grand Vitara), होंडा एलिवेट (Honda Elevate) सारख्या कारशी स्पर्धा करते.

हेही वाचा:

Toyota: लवकरच येतेय नवीन Fortuner Mild Hybrid; ‘या’ फिचर्ससह मिळणार दमदार मायलेज

Car loan Information:
Calculate Car Loan EMI

[ad_2]

Related posts