nepal viral news knife found in abdomen of young man suffering from pain

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nepal Viral News: एका तरुणाच्या पोटात दुखू लागल्याने तो उपचारासाठी डॉक्टरांकडे गेला. तपासणीदरम्यान डॉक्टरांना तरुणाच्या पोटावर जखमेचा व्रण आढळला, याबाबत डॉक्टरांनी विचारलं असता तरुणाने उडवाउडवीची उत्तरं दिली. शेवटी डॉक्टरांनी पोटदुखीचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी तरुणाचा एक्सरे काढला. पण एक्सरे पाहाताच डॉक्टर हैराण झाले. तरुणाच्या पोटात चक्क 15 सेंटीमीटर लांबीचा चाकू आढळला. (knife found in abdomen)

मारामारीदरम्यान पोटात चाकू
एक्सरे (X-ray) पाहिल्यानंतर डॉक्टरांनी तात्काळ तरुणाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. अतिशय किचकट शस्त्रक्रियेनंतर (Operation) डॉक्टरांनी तरुणाच्या पोटातून चाकू बाहेर काढला. त्यानंतर डॉक्टरांनी विश्वासात घेऊन तरुणाला नक्की काय घडलं याबाबत विचारणा केली. यावर काही दिवसांपूर्वी त्याची काही तरुणांबरोबर मारामारी झआल्याचं त्याने सांगितलं. हाणामारीदरम्यान एकाने त्या तरुणाच्या पोटात चाकू खुपसला. चाकू तरुणाच्या पोटात आरपार गेला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने तरुणाने एका स्थानिक डॉक्टरकडून उपचार केले. त्या डॉक्टरने कोणतीही तपासणी न करता जखमेवर टाके घातले. 

दारुच्या नशेत असल्याने त्यावेळी झालेली दुखापत फारशी जाणवली नसल्याचं त्या तरुणाने सांगितलं. पोटावर झालेली जखम भरली आणि टाकेही सुकले, त्यामुळे तरुणाने त्या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही. पण काही दिवसांनी त्याची तब्येत बिघडली.

तरुणाच्या पोटात दुखू लागलं
काही दिवसांनी तरुणाच्या पोटात प्रचंड दुखू लागलं. त्याला उल्टी आणि जुलाबाचाही त्रास सुरु झाला. त्रास वाढल्याने तरुणाने मोठ्या हॉस्पीटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे चाकू पोटात गेल्यानंतरही त्या तरुणाच्या इतर कोणत्याही अवयवांना दुखापत झाली नव्हती. 

एकतर्फी प्रेमातून हल्ला
दरम्यान, बिहारमध्ये एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून 12 वीत शिकणाऱ्या एका मुलीवर गोळी झाडली. त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाटणातल्या मसोढी ठाणा क्षेत्रात ही गंभीर घटना घडली. या घटनेने बिहारमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मृत मुलाचं नाव राजू कुमार असं होतं, तो मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. पण मुलीने नकार दिल्याने गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात होता अशी माहिती पोलिसांन दिली.

यातून 21 सप्टेंबरला मुलगी कॉलेजमधून घरी येत असताना राजू कुमारने तिला रस्त्यात गाठलं आणि गावठी कट्ट्याने तिच्यावर एक गोळी झाडली, त्यानंतर दुसऱी गोळी त्याने स्वत:वर झाडली

 

Related posts