Ujjain Rape Case Three More Person Detained In Ujjain Rape Case Know Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ujjain Rape Case : मध्यप्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवशंकर महाकालची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उज्जैनमध्ये एका 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. संतापजनक बाब म्हणजे, अत्याचार झाल्यानंतर ही पीडित चिमुरडी रक्तबंबाळ अवस्थेत तासन्तास मदतीची याचना करत तशीच फिरत राहिली. पण, भावनाशून्य समाजातून कोणीही तिच्या मदतीसाठी धाव घेतली नाही. अखेर पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केलं आणि या घटनेचा तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं आरोपींचा शोध घेतला असून रिक्षाचालकासह चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 

उज्जैनमधील 12 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यामध्ये एका रिक्षाचालकाला अटक करण्यात आली असून त्याचं वय 38 वर्ष आहे. त्यासोबतच इतर तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकली उज्जैनच्या जीवनखेडी परिसरात ऑटोमध्ये बसली होती. सीसीटीव्ही फुटेजमधून याची पुष्टी झाली आहे. आरोपी ड्रायव्हर राकेशच्या रिक्षाची पाहणी केली असता त्याच्या रिक्षामध्ये रक्ताचे डागही आढळून आले आहेत. याच आधारे रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे. तसेच, रिक्षाची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. तर, ताब्यात घेण्यात आलेल्या तीन इतर लोकांपैकी एक रिक्षाचालक आहे, तर ताब्यात घेण्यात आलेल्या इतर तीन जणांची चौकशी सुरू असून त्यांच्याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. 

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी चिमुकलीला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून समजलं की, घटना पहाटे 4 ते 5 वाजताच्या दरम्यान घडली. सीसीटीव्हीमध्ये दोन ऑटोरिक्षा दिसून आल्या. नीलगंगा परिसरातून ताब्यात घेण्यात आलेल्या एका ऑटो ड्रायव्हर राकेशला पोलिसांनी अट केली. तर दुसऱ्या ऑटो ड्रायव्हरला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. 

काय घडलं नेमकं? 

पोलीस अधीक्षक शर्मा यांनी सांगितले की,  ” पीडित मुलगी ही उत्तर प्रदेशातील असावी. तिच्याकडे कोणतेही ओळखपत्र नाही. पोलिसांना तिचे नाव आणि पत्ता नीट सांगू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले. पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, अल्पवयीनाची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी मंगळवारी इंदूरला नेण्यात आले. याप्रकरणी महाकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी एक विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पीडिताही गतीमंद असल्याचा अंदाज आहे. एका आश्रमाजवळ अर्धनग्न रक्तबंबाळ अवस्थेत ती फिरत आली. त्यानंतर एका पुजाऱ्याने तिला टॉवेलमध्ये गुंडाळले आणि रुग्णालयात दाखल केले. घटना नेमकी कुठं घडली, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. उज्जैनपासून 15 किमी अंतरावर असलेल्या बडनगर रस्त्यावर सीसीटीव्हीमध्ये पीडित अल्पवयीन फिरत असल्याचे दिसून आले. 

[ad_2]

Related posts