iPhone साठी Apple Store वर शेकडो तरुणांचा हल्ला! iPhone लूटमारीचे Videos पाहाच

( प्रगत भारत । pragatbharat.com)

iPhones Looted From Apple Store Video: अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये एक अजब घटना घडली आहे. येथील अ‍ॅपल या जगप्रसिद्ध कंपनीच्या दुकानावर काही तरुणांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्यांनी अ‍ॅपल स्टोअरमधून आयफोन, आयपॅड आणि इतर प्रोडक्टची लूट केली आहे. दुकानामध्ये घुसून अ‍ॅपलचे प्रोडक्ट अगदी कांदे-बटाटे पिशवीत भरावे त्याप्रमाणे प्लास्टीकच्या बॅगमध्ये भरुन या चोरांनी घटनास्थळावरुन धूम ठोकल्याचं पाहायला मिळालं. या हल्ल्यामध्ये शेकडो तरुण सहभागी होते. पोलीस या अ‍ॅपल स्टोअरमध्ये पोहचण्याआधीच हे दरोडेखोर फरार झाले. सोशल मीडियावर या दरोड्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

लूटमार करणाऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न

सोशल मीडियावर या लुटमारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही व्हिडीओंमध्ये या लूटमार करणाऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचं दिसतं. मात्र लूटमार करणाऱ्यांची संख्या पाहता पोलिसांना फारसं यश आलं नाही. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ‘एक्स’चे (ट्वीटरचे) मालक एलॉन मस्क यांनी सोशल मीडियावरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. अनेकांनी हे व्हिडीओ शेअर केले आहेत.

तुमचा विश्वास बसेल का?

“तुमचा विश्वास बसेल का हा अमेरिकेतील फिलाडेल्फियामधील व्हिडीओ आहे. लूटमार करणाऱ्यांनी अनेक दुकानांवर डल्ला मारला. त्यांनी आयफोन 15 प्रो मॅक्ससाठी अ‍ॅपलचं स्टोअरही लूटलं. अखेर पोलिसांनी शेवटच्या क्षणी घटनास्थळी धाव घेतली,” असं एका महिलेने म्हटलं आहे.

मस्क यांच्या पॅरडी अकाऊंटवरुन पोस्ट

एलॉन मस्क यांच्या नावाने असलेल्या पॅरडी अकाऊंटवरुनही याच लूटमारीचा व्हिडीओ शेअर कण्यातआला आहे. “हे फार दु:खद आहे. त्यांनी अ‍ॅपलचं स्टोअर लूटलं. आता आयफोन 15 एस उरलेच नाहीत,” असं या अकाऊंटवरुन म्हटलंय.

अ‍ॅपलच्या स्टोअरवर मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. पोलिसांनी काही तरुणांचा पाठलाग केला. हे तरुण पोलिसांच्या हाती लागले नाही पण आयपॅडचा ढीग मात्र पोलिसांना सापडला. ‘डेली मेल’ने या अ‍ॅपल स्टोअरी दुरावस्था झाल्याचं वृत्तात म्हटलं आहे. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी 12 तरुणांना अटक केली आहे.

Related posts