[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : पुण्यात (Pune Crime) एकीकडे विसर्जन मिरवणुक सुरु असताना (pune rape) मध्यरात्री घरी सोडतो, मदत करतो असं सांगत 32 वर्षीय महिलेवर 26 वर्षीय तरुणाने बलात्कार केला. ही घटना शुक्रवारी पहाटे 2.45 वाजण्याच्या सुमारास विमाननगर येथे घडली. दत्तात्रय खरात (26, रा. खराडी) असे आरोपीचे नाव आहे. तो एक महाविद्यालयीन विद्यार्थी आहे आणि पार्ट टाईम काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका खासगी कंपनीत मॅनेजर असून ती विमाननगर येथील एका कॅफेमध्ये तिच्या मित्रांसोबत ड्रिंक आणि डिनरसाठी गेली होती. 9,500 रुपयांच्या बिलावरून तिचा आणि त्यांच्या मित्रांमध्ये वाद झाला. मात्र तिच्या मित्रांनी बिल देण्यास टाळाटाळ करून तेथून पळ काढला. शेवटी तिला बिल भरावे लागले.
पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत तिने आरोप केला आहे की, कॅफे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी माझ्याजवळ येत बिलावरून वाद घातला, शिवीगाळ केली आणि माझे दोन मोबाईल फोन, आधार कार्ड, पॅन कार्ड, हेडफोन आणि तीन डेबिट कार्ड हिसकावून घेतले. त्यांनी आधी बिल भरा आणि नंतर सामान परत करु, असं सांगितलं.
एका खोलीत बलात्कार केला आणि तेथून पळ काढला
रात्री दीडच्या सुमारास हॉटेल कर्मचारी आणि पीडित महिला यांच्यात वाद झाला. त्य़ानंतर ती घरी जायला निघाली. कॅफेतून बाहेर पडली. त्यावेळी त्याच कॅफेबाहेर असलेल्या एका मुलाने सुरक्षितपणे घरी सोडतो म्हणून सांगितलं. मात्र गाडीवर बसवून त्याने तिला खराडीतील एका लॉजवर नेलं. तिचंच ओळखपत्र घेतलं आणि तिलाच नोंदवहीत सही करायला लावली. एका खोलीत बलात्कार केला आणि तेथून पळ काढला. नंतर ती लॉजच्या रिसेप्शनवर गेली आणि तिला हॉटेलमध्ये सोडणाऱ्या व्यक्तीची ओळख जाणून घेतली.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिने शुक्रवारी सकाळी पोलिसात जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. आम्ही आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा तपास करत आहोत. आरोपींवर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. कलम 376 (बलात्कारासाठी शिक्षा), 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि 323 (स्वैच्छिक दुखापत करण्यासाठी शिक्षा), 324 (324) अंतर्गत विमंतल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाची बातमी-
Pune News : हत्येच्या थरारानं पुणे शहर हादरलं! सेवानिवृत्त पोलिसांच्या मुलाला भर रस्त्यात सपासप वार करत संपवलं…
[ad_2]