Weird News Girl Shares Story After Found Something Dangerous In Boyfriend Phone After 5 Years Of Relationship | Trending: BF च्या फोनमध्ये दिसलं असं काही; प्रेयसीला बसला धक्का, म्हणाली

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Relationship Advise: जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये (Relationship) असाल, प्रेमात असाल तर त्या नात्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास (Trust). विश्वासाशिवाय नातेसंबंध टिकवून ठेवणं कठीण आहे. ज्या नात्यात विश्वास नाही, त्याला काही अर्थ नसतो आणि अशी नाती टिकत देखील नाही. अशीच काहीशी परिस्थिती सोशल मीडियावर एका तरुणीने सांगितली.

रेड्डिट (Reddit) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तरुणीने तिच्यासोबत घडलेली घटना शेअर केली आहे. तिने सांगितलं की, ती पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. यानंतर आता तिला तिच्या प्रियकराच्या फोनमध्ये असं काही सापडलं, ज्यामुळे तिला धक्का बसला. ती म्हणते की ती 29 वर्षांची आहे आणि 36 वर्षांच्या व्यक्तीसोबत पाच वर्षांपासून तिचे प्रेमसंबंध आहेत. पण आता असं काही घडलं, जे पाहून तरुणीच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

नेमकं घडलं काय?

मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, जेव्हा या तरुणीने तिच्या प्रियकराचा फोन चेक केला, तेव्हा तिला त्याचं टिंडर प्रोफाईल दिसलं. टिंडर हे एक डेटिंग अ‍ॅप आहे, ज्याद्वारे अनोळखी व्यक्तींचे फोटो पाहून त्यांच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले जातात. आता प्रेयसी असतानाही हा पुरुष हे अ‍ॅप वापरत असल्याने तरुणीला भीती वाटायला लागली, प्रियकर तिचा विश्वासघात तर करत नाही ना? अशा शंका तिच्या मनात येऊ लागल्या.

आता नेमकं करावं काय? हा तरुणीसमोर पेच

मुलीने सर्व हकिकत सांगताना पुढे म्हटलं की, ‘आम्ही नुकतेच मिनेसोटा (अमेरिकेला) आलो होतो, मी अमेरिकेत त्याच्यासोबत आणि त्याच्या कुटुंबासोबत राहण्यासाठी आले आहे. आम्हाला दोन वर्षांचा मुलगाही आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही खरोखरच हृदयद्रावक घटना आहे. हे नातं पुढे कसं न्यावं हे मला कळत नाही. मी मोठ्या चक्रव्यूहात अडकली आहे. इकडे आड, तिकडे विहीर अशी स्थिती माझी झाली आहे. कारण मी त्याच्यावर प्रेम करते, पण आपल्या विश्वासाला तडा गेला की त्रास होतो. त्यामुळे मला थोडा सल्ला हवा आहे. मला हे वाचणाऱ्या प्रत्येकाकडून सल्ला हवा आहे, मी त्याला थेट या सर्व प्रकाराबद्दल विचारावं? की याबद्दल कधी काही न बोलणं बरोबर राहील?’

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

या मुलीच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने या तरुणीप्रती चिंता व्यक्त करताना म्हटलं की, बिच्चारीला अजूनही हे नातं जपायचं आहे. या पोस्टवर दुसऱ्या एका युजरने म्हटलं की, ‘तुम्हाला अशा व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये का राहायचं आहे, जी तुमच्यावर प्रेम करत नाही, तुमची पर्वा करत नाही आणि तुमची जागा दुसऱ्याला देण्याची तयारी करत आहे?’

आणखी एका युजरने म्हटलं की, ‘जर त्याने अद्याप तुमची फसवणूक केली नसेल, तर तो आता नक्कीच फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे. तू हेरगिरी करत त्याचा फोन चेक केला यात तुझी चूक काय? तुला वाईट वाटलं आणि तू बरोबर आहेस, हे महत्त्वाचं.’

हेही वाचा:

Ignorance In Relationship : रिलेशनशिपमध्ये दुर्लक्ष केल्याचा दुष्परिणाम थेट शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर होतो , पाहा

[ad_2]

Related posts