भरमॉलमध्ये यूट्यूबरवर गोळी झाडणारा निर्दोष, जीवघेणा प्रँक Video आता होतोय Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Youtuber Shocking Video :  काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतील व्हर्जिनियामधील डलेस टाउन सेंटर मॉलमध्ये प्रसिद्ध यू्ट्यूब टॅनर कुकवर एका ग्राहकाने गोळी झाडली होती. या घटनेत तो गंभीर जखमी झाला होता. मॉलमधील पोलिसांनी त्या ग्राहकाला जेरबंद केलं होतं. टॅनर कुकने त्या ग्राहकासोबत प्रँक करत असताना ही धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आज इतक्या महिन्यांनंतर समोर आला आहे. शिवाय त्या ग्राहकाला कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. 

नेमकं काय आहे या व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमधून असं समोर आलं की, टॅनर कुक त्या मोबाइल फोनवर त्या ग्राहकाला त्रासदायक व्हिडीओ दाखवत होता. अॅलन कोली असं त्या ग्राहकाचं नाव आहे. तो टॅनर कुकला वारंवार सांगत होता, बाजूला हो. त्याच्या कृतीतून तो टॅनरला थांबवताना दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यापासून तो मोबाईल दूर ढकलतोय. साधारण 20 सेकंदांनंतर अॅलनने बंदुक काढली आणि त्या टॅनर कुकवर आपल्या बचावासाठी झाडली. ज्यामुळे YouTuber गंभीर जखमी झाला. 

तर टॅनर हा क्लासिफाइड गून्स नावाचं चॅनल चालवतो. त्यावर तो प्रँक व्हिडीओ शेअर करत असतो. त्याच चॅनलसाठी तो प्रँक व्हिडीओ करत असताना त्या ग्राहकाने त्याच्यावर गोळी झाली. आरोपी अॅलन कोलीच्या वकिलाने कोर्टात सिद्ध केलं की, त्याने स्वत:च्या संरक्षणासाठी गोळी झाडली. तर अनोखळी व्यक्तीकडून उलट त्याचा मानसिक छळ झाला असं कोर्टात सांगण्यात आलं. 

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी अॅलन कोलीची बाजू घेतली आहे. त्याने केलेल्या कृत्याचं समर्थन नेटकरानी केली आहे.

पण निवासस्थान म्हणजे मॉलमध्ये गोळीबार करण्याचा आरोपाखाली त्याला शिक्षा होण्याची शक्यता आहे. या आरोपाखाली त्याला 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची संभाव्य शिक्षा होण्याची शक्यता आहे. 

Related posts