Chandra Grahan 2023 : चंद्र ग्रहणाला ग्रह योग आणि गजकेसरी योग! 3 राशींवर अशुभ योग, तुमच्या राशीवर काय परिणाम?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chandra Grahan 2023 : वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणानंतर काही दिवसानंतर या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण होणार आहे. ग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी वैदिक ज्योतिषशास्त्रात त्याला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार सूर्यग्रहण हे अमावस्या तिथीला तर चंद्रग्रहण ही पौर्णिमा तिथीला होणार आहे. येत्या 28 ऑक्टोबरला चंद्रग्रहण होणार आहे. यादिवशी चंद्र मीन राशीतून मेष राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे यादिवशी मेष राशाती राहु गुरु यांची युतीमुळे ग्रहण योग आणि गुरुसोबतच्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होणार आहे. याचा परिणाम 12 राशींवर दिसून येणार आहे. कोणासाठी तो शुभ आणि कोणसाठी अशुभ ठरणार आहे ते जाणून घ्या. (lunar eclipse date 28 October and time chandra grahan 2023 effected zodiac signs)

मेष (Aries Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी वर्षातील चंद्रग्रहण अशुभ ठरणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी थोडे सावध राहण्याची गरज आहे. चंद्रग्रहणाच्या दिवशी घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. यामुळे भविष्यात नुकसान होऊ शकतं.

वृषभ (Taurus Zodiac)

वृषभ राशीच्या लोकांवर ग्रहणाचा अशुभ प्रभाव पडणार आहे. शत्रूंमुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकतं. या काळात तब्येतही बिघडू शकतं.

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण खूप फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. आर्थिक लाभाच्या उत्तम संधी मिळणार आहे. करिअर आणि व्यवसायात चांगली प्रगती होणार आहे.. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सन्मान आणि यश मिळणार आहे. या काळात तुम्हाला मोठे पद मिळणार आहे. 

कर्क (Cancer Zodiac)   

कर्क राशीच्या लोकांसाठीही चंद्रग्रहण अशुभ ठरणार आहे. आरोग्याबाबत काळजी घ्या. नोकरी करणाऱ्या लोकांना काही समस्यांना त्रासदायक ठरणार आहे. 

सिंह (Leo Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहणाचा प्रभाव चांगला असणार आहे. या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळणार आहे. नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. तुमची जबाबदारी वाढणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. 

कन्या (Virgo Zodiac) 

कन्या राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण संमिश्र परिणाम घेऊन येणार आहे. अडकलेले पैसे परत मिळणार आहे. मात्र या काळात तुम्हाला अनावश्यक खर्चावरही नियंत्रण ठेवावं लागणार आहे. 

तूळ (Libra Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना विशेष फायदेशीर ठरणार आहे. तूळ राशीच्या लोकांना चंद्रग्रहणाचा लाभ मिळणार आहे. नशिबाची साथ मिळणार आहे.  तुमच्या सर्व कामांना गती मिळणार आहे. प्रलंबित कामं लवकरच मार्गी लागणार आहे. 

वृश्चिक (Scorpio Zodiac)

चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे नोकरदार लोकांना करिअरमध्ये चांगली साथ मिळणार आहे. मात्र त्यांना शत्रूंमुळे अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या काळात सावध राहा. 

धनु (Sagittarius Zodiac)

चंद्रग्रहण धनु राशीच्या लोकांना आर्थिक लाभ देऊ शकते. या काळात तुम्हाला उत्पन्नाच्या नवीन संधी मिळू शकतात. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. तुमच्या मुलांच्या वागणुकीतील प्रगतीमुळे तुम्हीही आनंदी व्हाल.

मकर (Capricorn Zodiac)

चंद्रग्रहणाचा हा काळ मकर राशीच्या लोकांसाठी नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या समस्या लवकरच संपणार आहे. या काळात तुमचा मान-सन्मानत वाढ होणार आहे. 

कुंभ (Aquarius Zodiac) 

या राशीच्या लोकांना चंद्रग्रहणात पूर्ण साथ मिळणार आहे. नातेसंबंधातून तुम्हाला फायदा होणार आहे. अध्यात्माकडे तुमचा कल या दिवसांमध्ये वाढणार आहे. या काळात तुम्ही कोणत्याही गुंतवणुकीची योजना लाभदायक ठरणार आहे. 

मीन (Pisces Zodiac)

या राशीपासून आठव्या भावात चंद्रग्रहण होणार आहे. अशा परिस्थितीत या काळात मित्रांसोबत संबंध सुधारण्याच्या अनेक संधी मिळणार आहे. चंद्रग्रहणामुळे तुम्हाला तुमच्या प्रेमसंबंधात काही समस्यांना निर्माण होऊ शकतात. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts