Assembly Elections 2023 Election Commission Declared Five States Election

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Election Commission Press Conference:  मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा (Assembly Election 2023 Dates)  या  पाच राज्यांच्या विधानसभा  निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर झाला. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.  मध्यप्रदेशमध्ये 17 नोव्हेंबर, छत्तीसगडमध्ये 7 आणि17,  नोव्हेंबर,  राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर, मिझोरममध्ये 7 नोव्हेंबर आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पाचही राज्यांची  मतमोजणी 3 डिसेंबरला (Five State Election Result) रोजी होणार आहे. 

पाच राज्यात सोळा कोटीपेक्षा अधिक मतदार आहे. पाच राज्यात 679 जागांवर मतदान होणार आहे. 60 लाख युवा मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहे. मतदानासाठी नोंदणी  करणाऱ्यांमध्ये  महिलांची संख्या जास्त आहे. आदिवासी भागात PVTG मतदान केंद्राची सोय करण्यात  आली आहे.  ज्येष्ठ नागरिकांना व्होट फ्रॉम होम करता येणार आहे. लवकरच या पाच राज्यात आचारसंहिता  लागू करण्यात येणार आहे.   मिझोरममध्ये साडे आठ लाख, छत्तीगडमध्ये 2.03 कोटी, मध्य प्रदेशमध्ये 5.6 कोटी, राजस्थानमध्ये 5.25 कोटी आणि  और तेलंगणामध्ये 3.17 कोटी मतदार मतदान करणार आहेत.  

[ad_2]

Related posts