ABP C Voter Survey Nominating MPs In Rajasthan And Chhattisgarh Is It A Masterstroke Of Bjp Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या (Election) तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, सी व्होटरने ‘एबीपी न्यूज’साठी सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात  मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ निवडणुकीत भाजपच्या (BJP) खासदारांना तिकीट देणं हा भाजपचा मास्टरस्ट्रोक आहे का हा सवाल विचारण्यात आला होता. तर यावर लोकांचं काय म्हणणं ते या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने खासदार आणि मंत्र्यांना रिंगणात उतरवण्याची रणनीती अवलंबली आहे. त्यासाठी त्यांनी अनेक केंद्रीय मंत्री आणि खासदारांना तिकिटे दिली आहेत. दरम्यान, रविवारी (15 ऑक्टोबर) काँग्रेसने छत्तीसगढ, तेलंगणा आणि मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

जनतेची उत्तरं काय? 

मध्य प्रदेशातील 42 टक्के लोकांनी विधानसभेत खासदारांना तिकीट देण्याच्या भाजपच्या रणनीतीला मास्टरस्ट्रोक म्हटले आहे.त्याच वेळी, 48 टक्के लोकांनी हा मास्टरस्ट्रोक नसल्याचं म्हटलं आहे.  तर 10 टक्के लोक यावर कोणतेही उत्तर देऊ शकले नाहीत.  तर राजस्थानमध्ये  50 टक्के लोकांनी हा मास्टरस्ट्रोक असल्याचं म्हटलं आहे. तर 39 टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं. तर यावर 11 टक्के काहीही उत्तर देऊ शकले नाहीत. छत्तीसगढमधील 46 टक्के लोकांनी विधानसभेतून खासदार उभे करण्याच्या भाजपच्या निर्णयाला मास्टरस्ट्रोक म्हटले आहे. तर 40 टक्के लोक भाजपच्या या रणनितीशी सहमत नसल्याचं समोर आलं आहे. तर 14 टक्के लोक यावर आपले मत मांडू शकले नाहीत. 

‘या’ खासदारांना मिळाली विधानसभेची तिकिटे 

मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने गणेश सिंग, रीती पाठक, राकेश सिंग, उदय प्रताप सिंग, फग्गन सिंग कुलस्ते या खासदारांना तिकीट दिले आहे.तर रेणुका सिंह, गोमती साई, अरुण साओ आणि विजय बघेल हे देखील यावेळी विधानसभेच्या निवडणुका लढवणार आहेत.  त्याचवेळी, पक्षाने दिया कुमारी, बाबा बालकनाथ, हंसराज मीना, किरोडीलाल मीणा, भगीरथ चौधरी आणि नरेंद्र कुमार या खासदारांना राजस्थानमध्ये उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टीप – या सर्वेक्षणात 2 हजार 649 लोकांची मते घेण्यात आली आहेत. शनिवार (14 ऑक्टोबर) ते रविवार (15 ऑक्टोबर) दुपारपर्यंत हे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणातील त्रुटीचे मार्जिन प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे.

हेही वाचा : 

Congress Candidates List : मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणासाठी काँग्रेसकडून पहिली यादी जारी, कमलनाथ, भूपेश बघल यांच्यासह दिग्गजांचा समावेश

[ad_2]

Related posts