Video Of BJP MLA Dilip Makwana Stuck Between Pillars In Measuring Sin And Virtue Madhya Pradesh; पाप-पुण्याचं मोजमाप करणं अंगलट, मंदिरातील दोन खांबांमध्ये अडकले भाजप आमदार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

भोपाळ: रतलाम ग्रामीणचे भाजप आमदार दिलीप मकवाना यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आमदार दिलीप मकवाना मंदिराच्या दोन खांबांमध्ये अडकलेले दिसत आहेत. यावरून आमदारांना सोशल मीडियावर ट्रोलही केले जात आहे.

हा व्हिडिओ जवळपास २ वर्षे जुना आहे. हा व्हिडिओ गुणावदचे प्रसिद्ध शिवशक्ती मंदिर परिसरातील आहे. जिथे या खांबांमधून गेल्याने पाप-पुण्याचं मोजमाप केलं जातं. शिवमंदिरात दोन विशाल खांब आहेत, ज्यांना पाप-धर्माचे स्तंभ मानले जातात. या दोन खांबांमधील अंतर खूपच कमी आहे. असं मानलं जातं की जी व्यक्ती दोन खांबांमधून पटकन निघून जाते ती पुण्यवान आत्मा आहे आणि जी त्यात अडकते ती पापी आहे.

२ वर्षांची मैत्री, मग भरवस्तीत साक्षीचा खून; AC मॅकेनिक कसा बनला खुनी? साहिलची पूर्ण कहाणी
विधानसभा निवडणुका जवळ येताच काँग्रेस आणि भाजपचे नेते आणि कार्यकर्ते सोशल मीडियावर अॅक्टिव्ह मोडमध्ये दिसत आहेत. सोशल मीडियावर नेत्यांचे व्हिडिओ आणि जुनी वक्तव्यं खूप व्हायरल होत आहेत. रतलाम ग्रामीणचे आमदार दिलीप मकवाना यांना सध्या त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते आणि भाजपचे माजी आमदार मथुरालाल डामर यांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहेत.

तिकीट नाकारण्यात आलेल्या आमदारांच्या यादीत दिलीप मकवाना यांचं नाव आहे. अशा परिस्थितीत राजकीय कलाबाजी दाखवण्याच्या प्रक्रियेत पाप-पुण्याच्या खांबांमध्ये अडकलेल्या मंत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याचा फायदा घेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितलं की, पाप-पुण्य याचा पुरावा खुद्द आमदाराने खांबांमध्ये अडकून दिला आहे. बाकी विधानसभा निवडणुकीत जनताही त्यांना त्यांच्या कर्माची फळे देईल.

ओबीसी समाजात असा नेता होणार नाही; जावयाच्या निधनाने सासऱ्यांचा हुंदका दाटला

व्हायरल झालेला व्हिडिओ सुमारे २ वर्ष जुना असल्याचं सांगितलं जात आहे. जिथे ग्रामीण आमदार दिलीप मकवाना त्यांच्या सहकाऱ्यांसह मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते. येथे पूजा केल्यानंतर त्यांनी खांबाच्या मधून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा उपस्थितांनी त्यांचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर खांबांमध्ये अडकून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदाराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

नोटांमध्ये सापडलेल्या चिठ्ठीतून शिवशाही चालकाच्या मृत्यूचं गूढ उकललं, धक्कादायक कारण पुढे

[ad_2]

Related posts