Indian Navy SSC Recruitment 2023 For 224 Posts Apply Before 29 October At Joinindiannavy Gov In Job Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indian Navy SSC Recruitment 2023: जर तुम्हाला भारतीय नौदलात (Indian Navy) सामील व्हायचं असेल तर तुम्ही या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकता. भारतीय नौदलात शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. नौदलाकडून अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. भरती अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2023 आहे. तुम्हीही नौदलात काम करण्यासाठी उत्सुक असाल, तर आजच अर्ज दाखल करा, शेवटच्या तारखेपर्यंत अजिबात थांबू नका. या भरती मोहिमेद्वारे एकूण 224 पदांची भरती केली जाणार आहे.

निवड कशी होईल?

इंडियन नेवी एसएससी ऑफिसर भर्ती 2023 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांची अनेक पातळ्यांवर पडताळणी केली जाईल. परीक्षेचे अनेक टप्पे पार केल्यानंतर भारतीय नौदल SSC अधिकारी भरती 2023 साठी उमेदवारांची निवड केली जाईल. सर्वात आधी अर्जांची छाननी केली जाईल. त्यानंतर एसएसबीच्या मुलाखती होतील. पुढील टप्प्यात कागदपत्रांची पडताळणी करून शेवटी वैद्यकीय तपासणी केली जाईल. सर्व टप्पे पार करणाऱ्या उमेदवारांची निवड अंतिम असेल. त्यांना कामावर रुजू होण्यासाठी पत्रक दिलं जाईल. 

कसा कराल अर्ज? 

  • भरती प्रक्रियेतंर्गत अर्ज करण्यासाठी सर्वात आधी भारतीय नौदलाची अधिकृत वेबसाईट joinindiannavy.gov.in वर लॉगइन करा. 
  • वेबसाईटवर तुम्हाला अॅप्लिकेशन लिंक दिसेल, त्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवं पेज ओपन होईल, ज्यावर तुम्हाला अॅप्लिकेशन फॉर्म दिसेल. 
  • अॅप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित भरा आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्र अपलोड करा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर एकदा तपासून पाहा आणि सबमिट करा.
  • सर्व माहिती सबमिट केल्यानंतर अर्ज शुल्क भरावं लागेल. 
  • त्यानंतर तुमचा अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. प्रिंटआऊट काढा आणि तुमच्याकडे ठेवा. 

कुठे कराल अर्ज? 

भारतीय नौदल एसएससी अधिकारी पदासाठी केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल. हे करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. अर्ज करण्यासाठी joinindiannavy.gov.in. या वेबसाईटवर भेट देऊन तुम्ही भरतीच्या सूचना पाहू शकता आणि तपशील जाणून घेऊ शकता. आधी सर्व माहिती वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. 

अर्ज करण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही 

भारतीय नौदलाच्या या पदांसाठी जाहीर करण्यात आलेल्या भरतीसंदर्भात एक खास गोष्ट म्हणजे, उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क भरावं लागणार नाही. म्हणजेच, अर्ज शुल्क शून्य आहे. निवड केल्यास पगार 56,100 रुपये आणि इतर भत्तेही दिले जातील.

[ad_2]

Related posts