Bottom Of Every Page Of The Newspaper There Are Four Colour Dots Do You Know Their Meaning

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Newspaper Four Colour Dots: काही जणांना अनेक गोष्टींच्या सवयी असतात. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय करायचं? हे रोजचं ठरलेलं असतं. आता या सर्वातील एक सवय म्हणजे, रोज उठून वर्तमानपत्र (Newspaper) वाचणे. घरातील ज्येष्ठांना तर सकाळच्या चहासोबत हातात वाचायला वर्तमानपत्र लागतंच, त्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवात होत नाही.

तुम्हीही वर्तमानपत्र वाचत असाल, पण या दरम्यान वर्तमानपत्राच्या शेवटी असणाऱ्या चार रंगांच्या ठिपक्यांकडे (Four Coloured Dots) कधी तुमचं लक्ष गेलं का? आणि गेलं असेल तर हे ठिपके प्रत्येक पानाच्या शेवटी का बरं दिले जातात? असा प्रश्न कधी तुम्हाला पडला का? अनेक वेळा आपल्यासमोर अशा गोष्टी येतात, ज्याची उत्तरं आपल्याला माहिती नसतात. उत्तर मिळत नाही तोपर्यंत ‘हे असं का असावं?’ हा प्रश्न आपल्या मनात घर करुन राहतो. आज अशाच एका प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

वर्तमानपत्रावरील चार रंगांच्या ठिपक्यांचा अर्थ काय?

वर्तमानपत्राच्या प्रत्येक पानाच्या शेवटी दिसणाऱ्या या चार रंगांच्या ठिपक्यांना ‘कलर रेजिस्ट्रेशन मार्क्स’ किंवा ‘क्रॉप मार्क्स’ म्हणतात. हे रंग अनुक्रमे असतात – निळा, गुलाबी, पिवळा आणि काळा. इंग्रजीत या रंगांना CMYK असंही म्हणतात, ज्याचा फुल फॉर्म आहे – Cyan, Magenta, Yellow, Black. यातील Black हा रंग K (Key) या अक्षराने दर्शवला जातो.

वर्तमानपत्रात का दिले जातात हे चार रंगांचे ठिपके?

आता या क्षेत्रातील तज्ज्ञांना CMYK बद्दल माहीत असेल. पण ज्यांना याबद्दल माहीत नाही त्यांच्यासाठी सांगायचं झालं तर हे 4 बेस कलर आहेत. वर्तमानपत्रात दिसणारा कोणताही रंग हा या 4 रंगांच्या कॉम्बिनेशनमधून तयार केला जातो. प्रिंटीग करताना प्रिंट योग्य जागी आणि एका रेषेत आहे ना, हे पाहण्यासाठी या रंगांची मदत घेतली जाते.
 
जेव्हा वृत्तपत्राची छपाई सुरु होते, तेव्हा प्रिंट काढणारा व्यक्ती हे डॉट पाहतो. जर हे डॉट ठीक येत नसतील तर वृत्तपत्रात छापले जाणारे फोटो देखील खराब येतात, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे छपाई करणारा व्यक्ती वृत्तपत्राच्या तळाशी असलेले हे चार डॉट तपासून पाहत असतो. थोडक्यात वृत्तपत्रावरील हे ठिपके वृत्तपत्रावर योग्य कलर पॅटर्न बनवण्यासाठी डॉट मार्कर म्हणून काम करतात.

हेही वाचा:

Facts: सैन्याचं प्रशिक्षण घेऊन भारताच्या ‘या’ शहरात येतात इस्रायली ज्यू; जाणून घ्या कारण

[ad_2]

Related posts