[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
MP Congress Manifesto: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मध्यप्रदेश (Madhya Pradesh) काँग्रेसनं (Congress) जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्याला (Congress Manifesto) ‘प्रॉमिसरी नोट’ असं नाव दिलं आहे आणि त्यात 101 आश्वासनांचाही ठळकपणे उल्लेख केला आहे.
मध्यप्रदेश काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात तांदूळ 2600 रुपये आणि गहू 2599 रुपयांना खरेदी करण्याचं आश्वासन दिलं आहे. याशिवाय पक्षानं सत्तेत आल्यास शेणही खरेदी करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात रोजगाराच्या मुद्द्यावरही भर दिल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसनं राज्यात दोन लाख नव्या भरती प्रक्रिया राबवण्याचंही आश्वासन दिलं आहे.
राज्यातील नोकऱ्यांबाबत काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे की, मध्यप्रदेशाला आम्ही उद्योगाचं केंद्र बनवण्याच्या दृष्टीनं सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत. तसेच, शेतकऱ्यांची कर्ज माफ केली जातील, यासोबतच लोकांना 10 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 25 लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येणार असल्याचंही काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे.
मध्यप्रदेश काँग्रेसनं जाहीरनाम्यात काय-काय आश्वासनं दिलीत?
जय किसान ही कृषी कर्जमाफी योजना सुरूच ठेवणार असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. शेतकऱ्यांचं 2 रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाईल. यासोबतच महिलांना नारी सन्मान निधी म्हणून दरमहा 1500 रुपये दिले जातील, असंही जाहीरनाम्यात म्हटलं आहे. याव्यतिरिक्त घरगुती गॅस सिलिंडर 500 रुपयांना दिले जातील, इंदिरा गृह ज्योती योजनेंतर्गत 100 युनिट्स माफ आणि 200 युनिट्स अर्ध्या दरानं देण्यात येतील, असं सांगण्यात आलं आहे.
जुनी पेन्शन योजना 2005 OPS सुरू करणार असल्याचं काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी 5 हार्सपॉवरची वीज मोफत दिली जाईल, त्यासोबतच शेतकऱ्यांची थकीत वीजबिलं माफ करणार असल्याचंही काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलं आहे.
दिव्यांगांच्या पेन्शनची रक्कम 2 हजार रुपये करण्याचं आश्वासन
शेतकरी आंदोलन आणि विजेशी संबंधित खोटे आणि निराधार खटले मागे घेऊ, असं आश्वासनही काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात दिले आहेत. अनेक दिव्यांगांच्या पेन्शनची रक्कम 2 हजार रुपयांपर्यंत वाढवेल आणि जात जनगणना करेल, असंही आश्वासन देण्यात आलं आहे. यासोबतच सरकारी सेवा आणि योजनांमध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षण देणार असून संत शिरोमणी रविदास यांच्या नावानं स्किल अपग्रेडेशन युनिव्हर्सिटी स्थापन करणार असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. तेंदूपत्त्याचा मजुरीचा दर 4 हजार रुपये प्रति मानक बॅग असेल. पढो आणि पढाओ योजनेंतर्गत सरकारी शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या मुलांना दरमहा 500 रुपये आणि इयत्ता नववी ते दहावीच्या मुलांना दरमहा 1500 रुपये आणि इयत्ता अकरावी आणि बारावीच्या मुलांना 1500 रुपये देण्याचंही जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त काँग्रेसनं मध्य प्रदेशात मोफत शालेय शिक्षण देण्याचं आणि आदिवासी अधिसूचित भागांत काँग्रेसच्या कार्यकाळात बनवलेला पेसा कायदा लागू करण्याचं आश्वासन दिलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
नववधुला एक तोळं सोनं, विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट, तेलंगणात काँग्रेसच्या जाहीरनाम्यात एकापेक्षा एक मोठ्या घोषणा!
[ad_2]